हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, यात समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील १० व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे, त्यापेकी एक नांदेड जिल्ह्यातील नायगांव बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे, शिवानंद पांचाळ यांनी मागील काही वर्षांपासून गोर गरीब वयोवृद्ध अनाथ वंचित गरजुंपर्यंत पोहचून त्यांच्या मदतीसाठी शिवानंद पांचाळ यांचा मदतीचा यज्ञ नित्याने सुरू आहे, मदतीच्या यज्ञात शिवानंद पांचाळ हे नांव अनेकदा दिसून येते आहे.
बेवारस मनोरुग्ण असो कींवा बेघर अनाथ वयोवृद्ध असो किंवा दारात कोणीही नडलेला आला तर शिवानंद ची मदत होणारच शिवानंदच्या सर्वच गोष्टींचा उल्लेख कमी शब्दात करता येणार नाही, शिवानंद पांचाळ यांना ह्या पुरस्कारासाठी सार्थ निवड केल्याचे एका पञाद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष दादा भाऊ केदारे यांनी कळविले आहे , राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याने शिवानंद पांचाळ यांचे सर्वञ कौतुक केले जात आहे.