नांदेड,आनंदा बोकारे। नवा मोंढा नांदेड मधील सार्वजनिक शिव जन्मोत्सवात मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक मंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण तर उद्घाटक खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची कन्या भा.ज.पा.च्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या प्रणिता देवरे (चिखलीकर) यांनी उद्घाटन केले.
प्रणिता देवरे (चिखलीकर)यांचे अर्धवट भाषण चालू असताना पालक मंत्री आले. ताईने पालक मंत्र्यासह सर्व विरोधकाचे आदर युक्त शब्दांनी स्वागत केले. उद्घाटकीय भाषण आटोपते घेतले .तेव्हा श्रोत्यात नेतृत्व असावे तर असा मोठ्या मनाचे अशा भावना उमटल्या.त्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
मात्र पालकमंत्री व अन्य जनांनी कार्यक्रमाचे उद्घाटक असणाऱ्या प्रणिता देवरे(चिखलीकर) यांचे नामोल्लेख शेवटी घेतल्याचे सर्व श्रोत्यांच्या लक्षात आल्याने उलट चिखलीकराची उंची वाढल्याचे दिसून आले.सार्वजनिक कार्यक्रमात निपक्षपातीपणा हवा असा श्रोत्यात सूर निघाला ,असा संदेश जिल्हाभर गेला .