हिमायतनगर| तालुक्यात घरफोडीननंतर आत चोरटयांनी कार्यालय, दुकाने आणि आत शाळेचे कुलूप फोडून साहित्य लंपास करण्याचा सपाट सुरु केला आहे. काळ रात्रीला अज्ञात चोरटयांनी चक्क तालुक्यातील मौजे जवळगाव येथील शाळेतून ५३ हजारांचे साहित्य लंपास केले आहे.
जवळगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दीपक शंकरराव झांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी एलईडी टीव्ही, जनरेटर, १० बेटऱ्या असा अंदाजे ५३ हजारांचे साहित्य लंपास केले आहे. हा प्रकार आज सकाळी शाळेत गेल्यानंतर लक्षात आला, त्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार केंद्रे हे करत आहेत.