दगडफेक करत चोरटयांनी एकचि दिवशी केली ७ ठिकाणी चोरी
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे सवना, जिरोणा, महादापूर येथे दि ३० जानेवारी च्या मध्यरात्रीच्या अंदाजे १ ते 3 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरटयांनी कडाक्याच्या थंडीत नागरिक गाढ जोपल्याचा फायदा घेऊन धुमाकूळ घालत काही ठिकाणी दगडफेक करून चोऱ्या केल्याने गावकर्यांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यात मागील महिन्याभरापासून थांबलेल्या चोरीच्या घटना पुन्हा सुरु झाल्या असून, अज्ञात चोरट्यांच्या टोळीने हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना, जिरोणा, महादापूर येथे दि ३० जानेवारीच्या मध्यरात्रीला अक्षरशा धुमाकूळ घालत ६ ते ७ ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत तालुक्यातील सावन येथील केशव अनगुलवार यांच्या घरातील पेटी फोडून ७ हजार व ५ तोळे चांदी, जिरोणा येथील गजानन वानखेडे यांच्या घरातील पेटी फोडून ५ हजार ७०० रुपये, महादापूर येथील रेणुकाबाई पंडित बोथिंगेच्या गळ्यातील ६ हजारांची पोत हिसकावून घेतली. दरम्यान महिले आरडा ओरडा करताच त्यांचे पती उठले आणि त्यांनी चोरट्यास पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला परंत्तू दोघांच्या झटपट सुरु असताना बाहेरील अन्य चोरट्यानी दगडफेक केली त्यामुळे चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला तसेच भाऊराव लहानकर यांच्या घरातून ३ हजारांची चोरी केली त्यानंतर चोरटे सदाशिव बोथिंगे आणि शंकर अम्ले यांच्या घरचे दार तोडून आत घुसले यावेळी घरातील मंडळी जागी झाली असल्याने चोरटे फरार झाले आणि जाताजाता चोरटयांनी रामदास खूपसे यांचे घर रात्रीच्या वेळेला फोडून ऐवज ल॑पास केल्याचे सांगण्यात आले आहे
मागील काही महिन्यापासून तालुक्यात विशेषत: ग्रामीण भागामध्ये चोऱयांचे सत्र सुरूच आहे सध्या सुरु असलेल्या थंडीच्या लाटेचा फायदा घेत चोरटे पुन्हा सक्रिय झाल्यामुळे गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तालुक्यात सुरु असलेले चोरीचे सत्र कधी थांबणार ? असा प्रश्न गर्वारी विचारीत आहेत दरम्यान चोरीच्या या घटनेननंतर पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले मात्र चोरट्यांचा काहीच सुगावा लागला नाही चोरीच्या या घटना लक्षात घेता हिमायतनगर तालुक्याला आणखी पोलीस स्टाफ वाढून चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे मत णज नागरिकांनी व्यक्त केले आहे
हिमायतनगर तालुक्यात यापूर्वी खूप छोटया झाल्या मात्र सोयाबीन चोर सोडले तर अन्य घरफोडी, लुटमारीच्या एकही घटनेतील चोरट्याचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आले नाही त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असून, पुन्हा ग्रामीण भागातून चोरीच्या घटनेला सुरुवात झाली असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे आता तर कालच्या घटनेवरून चार्त्यानी नवीन शकलेलं लढवून चोरीच्या घटनेला अनजाम ञास सुरुवात केली आहे त्यामुळे हत्यार बाळगून वेळ प्रसंगी चोरटयांनी केलेली दगडफेक नागरिकांना जीवघेणे ठरत आहे हि बाब लक्षात घेता पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्यापुढे चोरट्याचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे