हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटीच्या १३ जागेसाठी २८ उमेदवारांचे नामनिर्देशन, आज छाननी -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
येथील बहुचर्चित असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून, काल दि.०३ जानेवारी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १३ जागेसाठी २८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटीच्या मतदार संघ १३ जागेसाठी निवडणूक दि.२९ जानेवारीला होणार असून, यात एकूण ११८० सभासद (मतदार) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून शिवसेना- काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत उमेदवारांची निवड करून नामनिर्देशन दाखल केले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी देखील उमेदवारी दाखल करून हम भी है... जोश मे... असे दाखवून दिले आहे.

 यात संजय ग्यानबा माने रा. हिमायतनगर - सर्वसाधारण, शेख इस्सा शेख इस्माइल रा. हिमायतनगर - सर्वसाधारण, देवकते आनंदराव माधवराव हिमायतनगर -भटक्या विमुक्त जाती जमाती, निम्मलवाड संजय विठ्ठल रा.पार्डी जा- सर्वसाधारण, दत्तात्रय तुकाराम गुंडेवार रा. हिमायतनगर - इतर मागासवर्गीय, कदम बळीराम हरी रा.डोल्हारी -सर्वसाधारण, राऊत राजकुमार गोविंदा रा. डोल्हारी - अनुसूचित जाती/जमाती, पाळजकर धुरपताबाई माधवराव रा. हिमायतनगर - महिला राखीव, वानखेडे परमेश्वर गणपती रा. हिमायतनगर - सर्वसाधारण, कदम शामराव ग्यानबाराव रा. टेभी -सर्वसाधारण, मेंडके मारुती सटवा रा. एकघरी - सर्वसाधारण, ताडकुले मारोती लक्ष्मण रा. वडगाव ज. - सर्वसाधारण, आरबटवाड पार्वता रामा रा. शेलोडा - महिला राखीव, चवरे शांताबाई केशव रा.हिमायतनगर - महिला राखीव, मुधोळकर पुष्पाताई प्रभाकर रा.हिमायतनगर - महिला राखीव, राऊत मोतीराम मुकिंदा रा. डोल्हारी - अनुसूचित जाती/जमाती, भोयर साहेबराव शामराव रा.शेलोडा- सर्वसाधारण, प्रवीण प्रकाश शिंदे रा. हिमायतनगर -सर्वसाधारण, तुप्तेवार संदीप दत्तात्रय रा. हिमायतनगर -सर्वसाधारण, शेख लाल शेख कादर रा. हिमायतनगर -सर्वसाधारण, कदम दत्तराव रामराव रा. डोल्हारी - सर्वसाधारण, ताडेवाड विठ्ठल रामजी रा. पार्डी ज.- सर्वसाधारण, ढोले उत्तम माणिकराव रा.एकघरी -सर्वसाधारण, उदय प्रभाकर देशपांडे रा. हिमायतनगर -सर्वसाधारण, गोरे मुकुंदराव महादू रा. वडगाव -भटक्या विमुक्त जाती जमाती, बुद्धेवाड विश्वनाथ संभाजी रा. टेंभी - इतर मागास वर्गीय, नरवाडे दिगंबर कोंडबा रा. डोल्हारी -अनुसूचित जाती/जमाती, शिंदे सुभाष जीवनजी रा. हिमायतनगर - इतर मागास वर्गीय या उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत.

या सर्व नामनिर्देशनाची मंगळवार दि.४ रोजी छाननी होऊन याच दिवशी दुपारी ४ पर्यंत, वैध नामनिर्देशन उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. ०५ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ 11 ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.  दि. २० जानेवारी रोजी अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्दी केली जाणार असून, याच दिनी उमेदवारांना निशाणी वाटप केले जाईल आहे. प्रत्यक्ष मतदान दि. २९ जानेवारीला सकाळी ८ ते ४ पर्यंत होईल व सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन पदाधिकारी निकाल निवड लगेचच केली जाईल. अशी माहिती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.  

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी हिमायनगर येथे १३ सदस्य असलेल्या निवडणुकीत सर्वसाधारण सदस्य ८, अनुसूचित जाती -जमाती १ सदस्य, महिला प्रतिनिधी २ सदस्य, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी १ या जागांसाठी उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी