हिमायतनगर| तालुक्यातील सवना, जिरोणा, रमनवाडी, महादापुर, दगडवाडी, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, चिचोंर्डी, एकघरी, वाशी शिवारातील पाचशिवेवर असलेल्या महादेव फाटा येथील पार्श्वनाथ यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. मात्र धर्मीक श्रद्धा असल्याने अभिषेक, महाप्रसाद व हर हर महादेवच्या गजरात कोरोनाचे नियम पाळून संपन्न झाली.
दरवर्षी जानेवारी महिन्यात येणाऱ्या पहिल्या सोमवारी हिमायतनगर तालुक्यातील नवसाला पावणाऱ्या पार्श्वनाथ मंदिरात तीन दिवसाची यात्रा भरविली जाते. या यात्रेत महादेवाचा अभिषेक, महापुजा, महाप्रसादासह विविध धार्मिक, सांकृतिक कार्यक्रम बरोंबरच खो-खो, लेझीम, कबड्डी, पशुप्रदर्शन, कुस्त्या, शंकरपटाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आणि यंदा ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत पार्श्वनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे.
परंत्तू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाची पूजा अर्चना खंडित होऊ नये म्हणून आज दि.०३ जानेवारी रोजी सर्वांच्या सहकार्यातुन सकाळी ९.०५ वा पार्श्वनाथाचा महाअभिषेक महापूजा संपन्न झाली. यावेळी दर्शनासाठी दाखल झलेल्या भाविकांनी कोरोनाचे नियम पाळत ठराविक अंतर ठेऊन महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी कोरोनाचं संकटातून मुक्ती देण्याची कामना करत हर हर महादेवाचा गजर केला. दुपारी १ वा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, यंदा यात्रेला परवानगी नसल्याने फक्त प्रसादाची व छोट्या साहित्याची अशी १० ते १५ दुकाने आली होती. यात्रेत दरवर्षी घेण्यात येणारे सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री परमेश्वर गोपतवाड यांनी दिली.