कोरोनाच्या नियंत्रणानंतर ग्रामीण भागातील शाळा परिसर पुन्हा गजबजले
हिमायतनगर, अनिल मादसवार| कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांनी तोंडाला मास्क, हाती डब्बा, पाण्याची बॉटल, पाठीवर दफ्तराचे ओझे घेऊन भविष्याचे स्वप्न पाहत शाळेत उपस्थिती होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाला पाहून शिक्षकांकडून देखील विद्यार्थ्यांचे आनंदाने स्वागत करत सुरक्षेबरोबर शिक्षणाचे धडे देऊ लागल्याने हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाला बहर आला असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.
कोरोना महामारीच्या कारणामुळे दोन वर्षाच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागाच्या अखात्यारीतील शाळा पुन्हा सुरु करण्याबाबतच्या दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे हिमायतनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत तंतोतंत पालन केले जात आहे. शाळेच्या पाहिल्या दिवसापासूनच शाळेचंय मुख्याध्यापक एम. जी. संगमनोर यांनी सर्व शिक्षक वृन्दाना प्रिप्लॅनींग करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. पुन्हा एकदा शाळा बंद करण्याची वेळ येऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेत चला मुलानो चला, असे आवाहन करत ‘मास्क नाही मग प्रवेश नाही, असा संदेश देणारा फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांना कोरोनासोबत शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले गेले आहे. त्यामुळे आजघडीला शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली असून, जवळपास ७० टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. त्यामुळे शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत आहेत.
कोरोनानानंतर विद्यार्थी उत्साहाने शाळेत येत आहेत, कोरोना संदर्भात शाळा सुरु झाल्यापासन एक चळवळ राबविली, विद्यार्थी व पालकांच्या सभा घेऊन सभेत कोरोना विरुद्ध लढण्याबाबतची चर्चा घडवून आणून त्या मंजूर करून घेतल्या. जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःला वाटलं पाहिजे कि आम्हीच ठरविल्याप्रमाणे वर्गात, मैदानात खेळताना मास्क वापरायचे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगलं प्रतिसाद दिला, पहिल्या दिवशी आम्ही सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. शाळा सुरुवात झाल्यानंतर त्यांचा शैक्षणिक दर्जा कसा आहे, अध्ययन वाचन, लेखन याचा अंदाज काढण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गट पाडले आहेत. दोन वर्षपासून शाळा बंद झाल्यामुळे त्यांच्या आकलन क्षमतेवर परिणाम झाला. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी खेळ मनोरंजन.... त्या विद्यार्थ्याला पुढे कसं घेऊन जात येईल.... त्याच्या अध्ययनात काय अडचण येते... हे जाणून घेऊन यासाठी वयक्तिक लक्ष देऊन प्रयत्न करत आहोत.
शाळेतील एका वर्ग खोलीत एका बाकावर एक विद्यार्थी अश्या पद्धतीने सोशल डिस्टंस व मास्क वापरूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. शाळेत दाखल होताच परिपाठ आणि प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून पाढे, गीत, यासह सर्व प्रकारचे पाठांतर करून घेतले जात आहे. त्यानंतर अध्ययन व शैक्षणिक मार्गदर्शन केलं जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळांनंतर शाळेत आलेल्यां विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणि उत्साहाचं वातावरण दिसते आहे. कोरोना संसर्गाचा धोका विद्यार्थ्यांना होऊ नये याची पुरेपूर काळजी घेते सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितता मिळावी यासाठी आमच्या शाळेचे शिक्षक संभाजी कदम, भीमराव हनवते, परमेश्वर बनसोडे, संजय पैलवाड, श्रीमती रायेवार मॅडम, संतोष पोकलेवाड, श्रीमती कोरकलकर मॅडम, श्रीमती चिबडे मॅडम, राजेश्वर चव्हाण, सचिन जाधव, श्रीमती रेश्मा मॅडम, अल्ला सर, मुल्ला सर, शाकेर सर, कैलास जाधव, आदी टीम जातीने लक्ष देत आहे.
दीड दोन वर्ष विद्यार्थी घरात होते त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम झाले. त्यासाठी शाळेतील पहिले आठ दिवस ७५ टक्के करमणूक आणि मौजमजा २५ टक्के अध्ययन केले. त्यानंतर आठ दिवसात ५० टक्के करमणूक आणि ५० टक्के गुणवत्ता याकडे लक्ष दिलंय. तिसऱ्या आठवड्यात प्रत्येक मुलाकडे पूर्ण वेळ व्यक्तिगत लक्ष देऊन रिडींग स्किल्स कसं डेव्हलप करता येईल त्याच्या अध्ययनाच्या अडचणी, समस्या लक्षात घेऊन मौज मजा करत कौशल्य विकसित करून त्याला वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आमच्या शिक्षणाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना वाचन आणि अध्ययनाची गोडी निर्माण झाली असून, सध्या ७० टक्के उपस्थिती पटसंख्या असल्याचे मुख्याध्यापक एम जी संगमनोर यांनी दिली.