अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांची माहिती
हिमायतनगर| पार्श्वनाथ पाचशिव महादेव यात्रेवर ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्ण संख्येचे संकटं आले असल्यामुळे प्रशासनाकडून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करुन यावर्षी पाचशिव महादेव यात्रा भरणार नसुन हि यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी सांगितले आहे.
हिमायतनगर तालुक्यात प्रसिद्ध असलेली सवना पार्श्वनाथ महादेव यात्रेत दरवर्षी कुस्त्यांच्या दगंली, लेझीम स्पर्धा, खेळ, क्रिकेट, यासह विविध कार्यक्रमांनी हा यात्रा उत्सव मोठ्या उत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. येथील पार्श्वनाथ महादेव दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. परंतु यावर्षी देखील यात्रेवर ओमायक्रोन व कोरोना महामारीचे संकटं असल्यामुळे राज्यात प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे दि. 3 जानेवारी पासून सुरू असणारी यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड व यात्रा कमिटीच्या पदाधिकारी यांनी बोलतांना दिली आहे.
सोमवारी भाविकांनी अतंर ठेवून, गर्दी न करता मास्क लावून दर्शन घ्यावे - गोपतवाड
पार्श्वनाथ महादेव यात्रा यावर्षी होणार नाही. परंतु सोमवारी दि. 3 जानेवारी रोजी सर्वांच्या सहकार्यातुन सकाळी ९.०५ वा महाअभिषेक आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १ वा प्रसादाचे आयोजन केले आहे. कोरोना, ओमायक्राॅनमुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी यात्रा भरणार नाही. अभिषेकासह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करून ठराविक अंतर ठेवावे गर्दी न करता दर्शन घेण्याचे आवाहन परमेश्वर गोपतवाड यांनी केले आहे.