नांदेड| ओमिक्रॉन, कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्याचा वाढलेला धोका आणि कोविड-19 चा प्रसार रोखणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यासाठी पुढील काही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानी पुढील काही निर्देश निर्गमीत केले आहेत. हे निर्देश 31 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून लागू होतील. या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याठत पुढील निर्बंध जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू केले आहेत.
विवाह समारंभाच्या बाबतीत समारंभ बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेवर असो त्याहठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्ती पुरती मर्यादित असेल. बंदिस्त जागेत किंवा मोकळ्या जागेवर, कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम, मग तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, त्यााठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.
अंत्य संस्कारांच्या बाबतीत जास्तीतजास्त उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असेल. राज्य / जिल्ह्या च्याब कोणत्याही गर्दीच्याी ठिकाणी, पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने इत्या/दी ठिकाणी, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याकबाबत निर्देश देण्या त आले आहेत. त्या नुसार नांदेड जिल्ह्या तील गर्दीच्याम ठिकाणी आवश्यसकतेनुसार तसे यथावकाश आदेश निर्गमित करण्या.त येतील. तसेच याअधी अस्तित्वाहत असलेल्या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील व संदर्भ 1 व 2 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. निर्गमीत आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका / नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच जिल्ह्या तील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुखांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील.