हिमायतनगरात चोरीच्या घटना होणार नाही याकडे प्राथमिक लक्ष देणार - पोनी.अशोक अंनत्रे -NNL


हिमायतनगर|
शहर व ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसते आहे, त्या घटनांना यावर घालून चोरट्यांच्या मुसक्या आवळणे हेच माझे प्रथमिक लक्ष असणार आहे. अशी माहिती हिमायतनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक अंनत्रे यांनी दिली.

ते हिमायतनगर येथील पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन शहर व ग्रामीण भागात होत असलेल्या चोरीच्या घटनेकडे लक्ष वेधले असता ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक अंनत्रे यांचा येथील कृउबाचे माजी संचालक रफिक सेठ यांनी स्वागत सत्कार केला. यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोवींद गोडसेलवार, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, वज्रसूची न्यूजचे संपादक शुद्धोधन हनवते, दैनिक वतनवालाचे पत्रकार अनिल नाईक, आदींची उपस्थिती होती. 

यावेळी पत्रकारांनी शहरातील घटना घडामोडीवर त्यांचे लक्ष वेधून शहरात शांतता व सुव्यस्था अबाधित ठेवत चोरीच्या घटना होणार नाही रस्ताही रात्रगस्त वाढविण्याचे सुचविले. त्यावर पोलीस निरीक्षक अशोक अंनत्रे म्हणाले कि, माझ्याकडे सध्या प्रभारी चार्ज आहे, तरीदेखील माझ्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व समस्यां मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. आजवर जे झाले ते झाले, परंतु नागरिकांनी देखील पोलिसांना खरी माहिती देऊन सहकार्य करणे महत्वाचे आहे. तसेच 'घर बंद करून एखादा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर माघारी येईपर्यंत आपल्या घरातील किमती वस्तू सुरक्षित राहतील की नाही याची सतत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू बैंकेच्या लोकरमधे ठेवल्यास सुरक्षित राहतील तसेच बाहेर गावी जात असल्याची माहिती आपल्या शेजार्यांना देऊन लक्ष देण्याचे सुचविणे गरजेचे आहे. 

गेली सहा महिन्यात चोरट्यांनी बंद घरांना आणि बंद दुकानाना लक्ष्य करून लाखो रुपयांची रोकड आणि किमती मुद्देमाल लंपास केला. तर काही ठिकाणी चोरट्यानी नागरिक असलेल्या घरात चोऱ्या करून दहशत पसरविली आहे. या घटनांमुळे सुट्टीच्या काळात पर्यटनासाठी बाहेर गेलेले किंवा गावाकडे गेलेल्या नागरिकांच्या आनंदावर विरजन पडले. अनेकांची आयुष्यभराची कमाई काही क्षणात लंपास झाली. चोरटे सापडतील आणि चोरीस गेलेला ऐवज मिळेल या आशेपोटी नागरिक पोलिस ठाण्यात धाव घेतात. मात्र काही नागरिक देखील घटनेची सत्यता पोलिसांना सांगत नाहीत, काही कधी तर गेल्या साहित्यापेक्षा वाढीव माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करतात. त्यामुळे आम्हाला व आमच्या टीमला तपास करण्यात अडचणी येत आहेत.  

तसेच या संदर्भात मी आमच्या सर्व पोलीस स्टाफला बोलावून कडक सूचना दिल्या आहेत. रात्रगस्तीवर असलेल्याना कर्मचाऱ्यांना गस्तीच्या काळातील भेटी दिलेल्या ठीक ठिकाणच्या लोकेशनसह फोटो घेऊन ठेवण्यास सांगितले. जेणेकरून आमचे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात कि नाही हे लक्षात येईल. तसेच हिमायतनगर शहरात केवळ बोटावर मोजण्याइतका आमचा स्टाफ आहे, यात आणखी काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी निवासस्थानासह इतर कोणत्याही सुविधा नसल्याने नाईलाजास्तव अपडाऊन करावे लागते आहे. तरीदेखील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याकडून प्रामाणीक काम करून घेण्याचा माझा पर्यटन आहे. त्यामुळे नकीच शहर व परिसरात घडणाऱ्या अप्रिय घटना चोरी, लूटमार यासारखे कृत्य होणार नाही याकडे प्राथमिक लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.    

आ.जवळगावकरांच्या माध्यमातून पोलीस स्टाफ वाढविण्यासाठी प्रयत्न करू - रफिक सेठ 

यावेळी बोलताना माजी संचालक शेख रफिक भाई म्हणाले कि, यापूर्वी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे साहेबानी पोलीस स्टाफची मागणी केली होती. मात्र कर्मचारी नसल्याने ते मिळू शकले नाहीत, आज पुन्हा एकदा पोलीस निरीक्षक अशोक अंनत्रे यांनी पदभार घेतल्यानंतर ठाण्यात केवळ ३ अधिकारी ३५ कर्मचारी असल्याने पोलीस स्टाफ कमी असल्याचा प्रश्न पुढे आला आहे. हिमायतनगर ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने ६० पोलीस कर्मचारी, ५ अधिकारी, आणि तालुक्यातील तीन सर्कलमध्ये पोलीस चौक्या होणे आवश्यक आहे. या संदर्भात मी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून हिमायतनगर ठाण्याला आणखी किमान १० तरी पोलीस कर्मचारी मिळावे आणि तालुक्यातील इतर ठिकाणी पोलीस चौक्या स्थापन व्हाव्यात. जेणेकरून कायदा व सुव्यस्था अबाधित राहून चोरीसह इतर घटनांना थांबतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकाराना दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी