हिमायतनगर| तालुक्यातील मौजे कामारी येथील सेवा सहकारी सोसायटीसाठी काल झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार बाजी मारली आहे. यात दोन जागा अगोदरच बिनविरोध निघाल्या होत्या तर १० उमेदवारांनी ५० पेक्षा अधिक मते मिळून विजयी झाल्याने आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या दबदबा अजूनही येथे कायम असल्याचे माजी पंचायत समितीचे सभापती जोगेंद्र नरवाडे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे.मागील अनेक वर्षानंतर जाहीर झालेल्या तालुक्यातील मौजे कामारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाल्यापासून शिवसेना- काँग्रेस पक्षाने आपला वरचष्मा कसा राहील यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले होते. त्यामुळे काल झालेल्या चिठीच्या मतदानानंतर सर्वांचे निकाल काय लागतो याकडे लक्ष लागून होते. तत्पूर्वी २ जागेवर काँग्रेसचे प्रकाश नरवाडे आणि वाघमारे व शिवसेनेचे भालेराव हे तिघे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे दि.१४ संक्रांति दिनी १० जागेसाठी झालेल्या निवडणुकीत २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीची मोतमोजणी सुरु असताना निकालासाठी खूप उशिरा झाला.
शेवटी रात्री ७ वाजता निकाल घोषित झाला ज्यात गणेशराव तुकाराम शिरफुले, गंगाधर दत्तराम देवराये, मधुकर सीताराम शिरफुले, रामराव शंकरराव शिरफुले, चांदराव तुकाराम शिरफुले, विठ्ठलराव सुदामराव जाधव, पांडूरंग देवराव पवार, सुमनबाई श्यामराव कदम, ज्ञानेश्वर विठ्ठलराव शिरफुले, ओमरीता साईनाथ चव्हाण या उमेदरवारांचा विजय झाला. निकाल घोषित होताच गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला. सोसायटीवर निवडून आलेल्या सर्व संचालकांचे मा. खा. सुभाष वानखेडे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, माजी जी. प.सदस्य सुभाष राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ, माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, शहर अध्यक्ष संजय माने, परमेश्वर गोपतवाड, आदींसह अनेकांनी अभिनंदन केले.