जनतेच्या कामात कुचराई करणार्यांची गय नाही - आ. जवळगावकर
हिमायतनगर। तहसील कार्यालयातील मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणी राहुन कार्यालयात आपल्या मर्जीने उपस्थित राहून जनतेच्या कामात कुचराई करीत नागरीकांना कामासाठी हेलपाटे मारावे लावत असल्याच्या तक्रारी वाढल्याने गुरूवारी दुपारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी तहसिल कार्यालयास भेट देऊन कर्मचार्यांच्या कामाचा लेखाजोखा विचारत चागंलेच धारेवर धरले व नागरीकांना कामासाठी अडवणूक कराणारांची गया करणार नाही असेही त्यांनी सुनावले आहे.हिमायतनगर तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकांच्या कामासाठी अडवणूक होत असुन दिल्या घेतल्याशिवाय कामे नाहीत. पुरवठा विभागातील कामे सहा सहा महिन्यापासून होत नसल्यामुळे नागरीक त्रस्त होत आहेत. यामुळे गुरूवारी दुपारी अचानक आ. माधवराव पाटील जवळगावकर तहसील कार्यालयास भेट दिली. उपस्थित कर्मचारी यांची हजेरी घेतली व अनुपस्थित असणाऱ्या ची अनुपस्थिति दाखवा असे सांगितले.
गोरगरीब निराधार लाभार्थींची अडवणूक होता कामा नये निराधार यांचे जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करून घेण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागासह शहरातील नागरीकांना कुठल्याही कामात अडथळा ऐता कामा नये अन्यथा कुचराई करणार्यांची गया केली जाणार नाही अशी तंबी आ. जवळगावकर यांनी उपस्थित कर्मचार्यांना दिली आहे. तसेच तहसील मध्ये कर्मचारी यांची कमतरता असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले असता जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून येथील जागा तात्काळ भरण्याचे अवाहन जवळगावकर यांनी केले आहे.
मयताच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचे वितरण आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार डि डि गायकवाड, नायब तहसीलदार राठोड, सुभाष राठोड, गणेश शिंदे,परमेश्वर गोपतवाड,अ.आखील अ. वाहेद, डॉ प्रकाश वानखेडे, समद खान, संजय माने, महेश ताडकुले, सुभाष बलपेलवाड, शिवाजी पाटील, कानबा पोपलवार,अ. बाकी, रहेमान भाई, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.