मागील २२ तारखेला आला होता कोरोना पॉझिटीव्ह
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तीन पैकी दोघांचे दि.२७ रोजी ओमायक्रॉन अहवाल पॉजिटीव्ह आले होते. त्यापैकी एकाच हवाल प्रलंबित होता. त्या तिसऱ्या व्यक्तीचा अहवाल आज ओमेक्रोन बाधित म्हणजे पॉजिटीव्ह आला असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही अश्यानी लसीकरण करून घ्यावे व कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात विदेशातून ३०२ जण दाखल झाले होते. या सर्वांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्यानंतर हिमायतनगर येथील तिघांचे अहवाल दि.२२ रोजी कोरोना पॉजिटीव्ह आले होते. त्या तीन संशयित रुग्णाचे जीनोम सिक्वेन्सिंग पुण्यातील पुण्यातील राष्ट्रीय विष्णूजन्य औषध संस्था प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तब्बल ५ दिवसाने तिघांपॆकी दोघांचे सिक्वेन्स अहवाल ओमेक्रोन पॉझिटिव्ह आले तर एकाच अहवाल प्रलंबित होता. त्यानंतर प्रलंबित एका कोरोना रुग्णाचा अहवाल काय येतो याकडे हिमायतनगर वासियांचे लक्ष लागून होते.
तब्बल ८ दिवसांनंतर प्रलंबित असलेल्या हिमायतनगर येथील अन्य एका कोरोना बाधीत रुग्णाचा सिक्वेन्सिंग अहवाल दि.३० डिसेंबर रोजी ओमायक्रॉन बाधीत (पॉझिटिव्ह) आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून हिमायतनगर येथे आलेले २ पॉझिटिव्ह रुग्णावर नांदेड येथे उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यात ३१ वर्षीय महिला व ६ वर्षीय मुलीचा समावेश असून, आज ओमेक्रोन बाधित आलेला व्यक्ती हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या रुग्णांवर नांदेडला उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थित असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव वाढू नये म्हणून प्रत्येकानी लसीकरण करून घ्यावे आणि नियमांचे पालन करणे गरजचे असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.