मारतळा बायोडिझल धाड प्रकरणात ३५ लाखाचा ऐवज जप्त ; उस्माननगर पोलिसात गुन्हा दाखल -NNL


लोहा|
तालुक्यातील मारतळा परिसरात एका हॉटेलमागे अवैधरित्या बायोडिझेल विक्री करणाऱ्या ठिकाणी काल रात्री तहसीलदार व्यंकटेश मुंडे , नायब तहसीलदार राम बोरगावकर यांच्या महसूल प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली यात ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहर व परिसरात अनधिकृतरित्या बायोडिझेलची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या अड्ड्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून कारवाई सुरू केली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी नांदेड शहरात व परिसरात बायोडीझेलवर कारवाई केल्यानंतर मंगळवारी दि. २८ रोजी रात्री आठ वाजता मारतळा परिसरात चंद्रलोक धाबा परिसरात उपविभागीय अधिकारी विकास माने आणि लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नायब तहसीलदार राम बोरगावकर, उस्माननगर चे सपोनि यांच्या पथकाने कारवाई केली.

या कार्यवाहीत नंबर नसलेल्या एका आयचर टेपों , बाजूस उभी असलेल्या ट्रक क्रं ए.पी.२४ व्ही २७२३ मध्ये बायोडिझेल भरतेवेळी पथकाने छापा टाकला. बायोडिझेल अंदाजे ६०० लिटर किंमत ४२ हजार रुपये त्यासह दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली त्याची एकूण सुमारे ३५ लाख रुपये किमती असा मुद्देमाल महसूल प्रशासनाने पोलिसांच्या ताब्यात दिले.या प्रकरणी नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मान नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

मारतळा परिसरात अवैधरित्या विकणाऱ्या ठिकाणावर पथकाने धाड मारल्याणे अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. लोहा तालुक्यात पहिल्यांदाच बायोडिझल वर कार्यवाही झाली. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही धाडसी कार्यवाही झाली यांनी. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवप्रकाश हे करत आहेत. या कारवाईमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात बायोडिझेलचा गोरखधंदा उघडकीस आल्याने आणि अनधिकृत बायोडिझेल विक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी