लोहा| शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय लोहा येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांची भाषणे झाली तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
पपू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य यावर विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. शाळेतील शिक्षक बालाजी गवाले, रमेश पिठ्ठलवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य व भारतीय संविधानाचे महत्व या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. माध्यमिक चे मुख्याध्यापक दामोदर वडजे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
क्रीडा शिक्षक, दिलीप कहाळेकर, हरिहर धुतमल, शब्बीर शेख, विश्वनाथ गुद्दे, संगमेश्र्वर पवार, सौ. उषाताई सराफ, सौ, मीनाताई कळकेकर, श्रीमती सुमन आढाव, शंकर शेटे, विठ्ठल वडजे, व्यंकट पवार, सौ. रुक्मिनबाई शेंडगे, श्रीमती खरात यासह विद्यार्थी उपस्थित होते.