अर्धापूर, निळकंठ मदने| निपक्षपाती, पारदर्शक पत्रकारतीमुळे लोकशाही जिवंत असल्याचे प्रतिपादन काॅग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले.
नांदेड मनपाच्या उपमहापैरपदी अब्दुल गफ्फार अ.सतार, स्थायी समितीच्या सभापतीपदी किशोर स्वामी यांची निवड झाल्याबद्दल अर्धापूरात सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर हे होते,तर प्रमुख पाहुणे सर्च संजय देशमुख लहानकर, युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, नगरसेवक हाटकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,शहराध्यक्ष राजेश्र्वर शेटे,शेख लायक,निळकंठराव मदने,प्रविण देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस सुभाष लोणे,माजी अध्यक्ष निळकंठराव मदने,गुणवंत विरकर, उध्दव सरोदे,शंकर ढगे,डाॅ. काजी मुख्तारोदीन,युनुस नदाफ, अँड.गोरव सरोदे,शेख शकील यांनी मनपाचे नवनियुक्त पदाधिकारी अ.गफ्फार,किशोर स्वामी यांचा सत्कार केला.याप्रसंगी आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले कि,लोकशाही चा चौथा आधारस्तंभ पत्रकारीता असून,लोकशाही ला संपविण्याचा कट करणारावर पत्रकारितेचा अंकुश असून,लोकशाही प्रदान देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे, असे ते म्हणाले.
किशोर स्वामी व अब्दुल गफ्फार यांनी सत्काराला सकारात्मक उतर दिले.यावेळी आदिंची भाषणे झाली,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सुभाष लोणे, प्रस्तावित निळकंठ मदने व आभार उध्दव सरोदे यांनी मानले.यावेळी पंडीतराव लंगडे,डाॅ.विशाल लंगडे,नासेरखान पठाण,मनसब शेठ,गाजी काजी, उमेश सरोदे,व्यंकटराव साखरे,नवनाथ बारसे,छत्रपती कानोडे,पंडीत शेटे,व्य॔कटी राऊत,बाळू पाटील, गोपाळ पंडीत,आनंद मोरे,यांची उपस्थिती होती.