आर्थिक व्यवहार करून बांधकाम परवानगी देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा- संभाजी ब्रिगेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे पळसपूर रस्त्यावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेताची ग्रामपंचायतीच्या मालमत्ता रजिस्टरला नोंद नसताना तत्कालीन ग्रामसेवकाने आर्थिक व्यवहार करून बांधकाम परवानगी दिली. त्यामुळे जतनबाई शेखावत आश्रम शाळा बनावट कागदपत्राद्वारे अनुदान लाटत असल्याचा संशय आहे. त्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड माजी तालुकाध्यक्ष गोविंद शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर रोडवर सौ.इंदिराबाई श्रीराम वाळके यांच्या मालकीची जागा आजघडीला नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये आहे. त्यांच्या मालमत्ता रजिस्टरला घर क्रमांक ६१६ आहे. नगरपंचायत कार्यालयाचे पत्र जा.क्र. नपही/विभाग/वसुली विभाग/५४५/२०२१ नुसार सदरील जग हि मालमत्ता रजिस्टरला बिगर शेती वानिजीक प्रयोजनार्थ वापर करण्याची परवानगी जा.क्र.२०१६/जमा/अकृषिक/सी आर ६३ तहसील कार्यालय हिमायतनगर दि.०६/०८/२०१६ च्या नंतर नोंद घेतलेली असल्याचे सांगितले आहे.
परंतु गोविंद शिंदे यांनी घेतलेल्या माहिती अधिकार मागणी पत्रानुसार सदरील जागेवरील बांधकामाची परवानगी जा.क्र.४६६ ग्रा.प.हिमायतनगर दि.०९/०१/२०१५ रोजी दिल्याचे दिसून येते आहे. सदरील मालमत्तेवर आज रोजी मातोश्री जतनबाई रामलिंग शेखावत माध्यमिक मराठी आश्रम शाळा असून, आपल्या बांधकाम परवानगी नुसार शासनाचे अनुदान लाटत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे या प्रकरणी बनावट दस्तऐवज कागदपत्रे तयार केल्याचे दिसून येत आहे. यातून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. हि बाब लक्षात घेता मुख्याधिकारी साहेबानी सदरील प्रकरणी योग्य ती खातेनिहाय चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. अन्यथा यासाठी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा दि.२५ नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे गोविंद शिंदे यांनी दिला आहे. परंतु अद्यापही या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे तक्रारकर्त्याने म्हणणे आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी जिल्हाधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारी हदगाव, तहसीलदार हिमायतनगर व सर्व पत्रकार बांधवाना दिले आहे.