महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव हलगीच्या भव्य मिरवणुकीने साजरा -NNL


हिमायतनगर|
शहरातील बोरगडी रस्त्यावर असलेल्या महाकाली मंदिरात महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव दिनांक 9 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे. या पार्शवभूमीवर परिसरातील सर्व भाविक भक्त, पोतराज यांची उपस्थिती होती. दि. ०९ रोजी सायंकाळी हलगीच्या तालावर शहरातील मुख्य रस्त्याने छबिना मिरवणूक काढण्यात आली होती.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव मिती मार्गशीष शुद्ध ६ शके १९४३  चंपाषष्टी दिनांक ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी ११.३० श्री साईनाथ बडवे महाराज यांच्या शुभहस्ते श्री महाकाली मातेचे अभिषेक, गादी, झेंडा व लाड जागेचे पूजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता बंडू देवकर, बाळू देवकर यांच्या हस्ते गादी व छबिना पूजन केल्यानंतर मातेची पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून हलगीच्या तालात काढण्यात आली. सदर मिरवणूक हि मोठा मारुती मंदिर बाजार लाईन, पोचंमा देवी मंदिर, बारतोंडी देवी मंदिर, तुका देवी मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, संतोषी माता मंदिर, लकडोबा मंदिर, आडेला देवी मंदिर, परमेश्वर मंदिर, पवनसुत हनुमान मंदिर, कालिंका मंदिरातून परत श्री महाकाली मंदिर पर्यंत काढण्यात आली. 


या मिरवणुकीत पोतराज मंडळींसह महिला मंडळींनी सहभाग घेऊन हलगीच्या तालावर नृत्य सादर केले. त्यानंतर मिरवणूक परत येताच भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर रात्री ९.३०  वाजता गणपत गुरुजीची आरती त्यानंतर पापन्ना पोतराज, आनंद पोतराज यांचा जागर होणार आहे.  दिनांक१० डिसेंबर रोजी उत्तर रात्री ४.४९ वाजता लाडचा कार्यक्रम व सकाळी ७.००  वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास संस्थापक गुरुपरंपरा प्रेरित गुरू महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिव माता माय निवघा बाजार तालुका हदगाव, गणपती महाराज चालगणी तालुका उमरखेड, शिवाजी शिंदे महाराज चालगणी तालुका उमरखेड, गुरु दिगंबर महाराज ईठेवाड पार्डी तालुका मूधोळ, यांचे शिष्य श्री निळकंठ बालाजी गायकवाड (देवकर) उपस्थित राहणार आहेत.सदरील कार्यक्रमास देवकर, पोतराज मंडळीनी आपली उपस्थिती लावली होती. 

यावेळी शामराव पोतराज, नागोराव पोतराज, सोमाजी पोतराज, बाबुराव पोतराज, सेवक चांदराव बनसोडे, संत देव माया, सौ. सखुबाई पोचिराम बनसोडे, अनुसया बनसोडे, सौ. मिनाबाई मंडोजवार, देविदास मंडोजवार, बंडू बनसोडे, गोदावरी गुनाजी बिजोरे, चंद्रकांत बिजोरे, लक्ष्‍मीबाई गंगाधर गड्डमवार, भागीरथाबाई करंजीकर, दत्ता महाराज करंजीकर, अनुसयाबाई मिरे, मायाबाई वाघमारे, अनुसयाबाई येलकेवाड, मोहन भारती, गोपी गिरी, मनीषा सोळंके, वंदना खंदारे, जनाताई,संतोष गायकवाड, कलावतीबाई गिरी, अनुसयाबाई जानगेवाड, प्रयागबाई आचेमवाड, अमोल भडंगे, सोनबा काळे, कांताबाई बनसोडे, कमलबाई जाधव, गंगाबाई चाटलेवाड, कमलबाई गायकवाड, परमेश्वर नरहरी इत्यादी पोतराज व गावकरी मंडळी उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजक संजय परमेश्वर मादसवार यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी