महावितरणकडून सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे हिमायतनगरातील रब्बीचे पिके वाळू लागली -NNL

महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात


हिमायतनगर|
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हिमायतनगर तालुक्याचे सर्वाधिक नुकसान केल्यानंतरही बळीराजाने रब्बीच्या उत्पादनातून खरिपात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. मात्र ऐन रब्बीच्या मोसमात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देयके वसुली बाबत सक्तीचे धोरण अवलंबून वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाट लावल्यामुळे रब्बीची पिके वाळण्याच्या मार्गावर आली आहेत. तात्काळ शासनाने महावितरण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करून सक्तीच्या वीजबिल वसुलीवर अंकुश लावावा. अन्यथा शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. याची सर्वस्व जबाबदारी हि महाविकास आघाडी सरकारची असेल अश्या संतापजनक भावना शेतकरी बोलून दाखवीत आहेत.

यंदा खरीप हंगामाच्या मध्यावधीतून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला. त्यानंतर बळीराजाने रब्बीच्या मोसमातून खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी पिकाच्या पेरणीला सुरुवात केली, मात्र ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने पहिलेच उशिर झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीतही दुबार पेरणीची वेळ आली आहे. या संकटाचा सामना करत शेतकऱ्याने गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, ज्वारी आदींसह इतर पिकांची पेरणी केली. हि पिके वाऱ्यावर डोलत असताना ढगाळ वातावरणाने शेतकऱ्याची चिंता वाढविली. त्यातून शेतकरी तरल असला तरी आता मात्र महावितरण कंपनीच्या मन्मनाई देयके वसुली पद्धतीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमुळे येथील अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांच्या वीजपंपाच्या देयके वसुलीला सुरुवात केली आहे. ज्या डीपीवरील शेतकऱ्यांनी लाईट बिल भरले नाही आणि काही भरलेल्या शेतकऱ्यांचे देखील वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाट लावला आहे. खरे पाहता शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात देयके भरण्याची मुभा देऊन रब्बीच्या पिकासाठी सहकार्याची भावना ठेवणे गरजेचे होते. मात्र ज्या शेतकऱ्याने लाईट बील भरले त्याचा देखील विद्युत पुरवठा सुरळीतपणे चालू करून देण्यात चालढकल केली जात आहे. त्यामुळे नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु केला असल्याचा आरोप डोळ्यादेखत पाणी देता आले नसल्याने वळून जात असलेली पिके पाहणाऱ्या शेतकरी बांधवानी केला आहे.

तात्काळ देयके भरलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करून द्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा प्रहारचे माजी उपजिल्हाप्रमुख  बालाजी बलपेलवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिला आहे. तसेच महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्यास शासनाचे आदेश असल्याचे संगितले. बलपेलवाड यांच्या मते कृषी पंपाचे वीज खंडित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले नसून, अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नका अशी विनंती महावितरण अधिकाऱ्यास केली आहे.

शेतकरी रब्बीच्या हंगामात अडचणीत आलेला असताना हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व विविध पक्षातील नेते मंडळी आपापल्या क्षेत्रांमध्ये येणार्‍या निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातली रब्बीचे उभे पीक वाळत आहे. यांच्याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणाबाबत नरजाई व्यक्त केली जात असून, शेतकरी काय..? फक्त मतदानासाठीच आहे का..? असा संतापजनक सवालही करत आहे. आज शेतकरी संकटांमध्ये असून, शेतकर्‍यांनी गहू, हरभरा, ज्वारी, सूर्यफूल, कार्डाची यासह विविध प्रकारची रब्बी पिकाचे पेरणी केली. मात्र विद्युत पुअरवठा सुरळीत होत  नसल्या कारणाने शेतकर्यां याच देही याच डोळा उभे पिक वाळत असताना पाहण्याची वेळ आली आहे. हे पाहून तरी सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ऊर्जा मंत्र्याकडे पाठपुरावा करून महावितरण अधिकाऱ्यास जागृत करत शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भावना ठेवण्याचे आदेशित करावे. कारण शेतकरी जगला तर देश जगेल.. शेतकऱ्यांनी मतदान केलं नाहीतर आपण खुर्चीवर बसू शकणार नाही याची जाण ठेवावी अश्या भावना देखील अनेकांकडून व्यक्त होत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी