संस्कृतीक कला मंचाच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे अयोज़न
हिमायतनगर, अनिल मादसवार| २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हिमायतनगर शहरात आयोजित "कुछ याद उन्हे भी करलो" या देशभक्तीपर गीताच्या कार्यक्रम आंबेडकर चौकात भारतीय सैन्यातील जवान, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी शाहदी जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून "भारत माता कि जय"... वीज जवान अमर रहेंच्या घोषणांनी शहर दुमदुमले.
गेल्या अनेक वर्षापासून स.अखिल यांच्या सरगम सांस्कृतिक कला संचाच्या वतीने शहिदांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचा पार्श्वभूमीवर दि.२६ नोव्हेंबर तथा संविधान दिनी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावर उपस्थित मान्यवरांसह कलाकार व प्रेक्षकांनी मुंबई येथे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सेवानिवृत्त जवान कैलास सावते, तसेच सैनिक श्रमकुमार बोरगावकर, सैनिक गणेश गव्हाणे, आणि येथील एका सैनिकाच्या वडिलांसह हिमायतनगर शहरातील नागरिकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या पोलीस दलातील कर्तबगात सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, जमादार अशोक सिंगणवाड, हेडकॉन्टेबल जोंधळे, पोलीस नाईक नागरगोजे आदींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंचावर डॉ.दामोधर राठोड, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, शहराध्यक्ष संजय माने, परमेश्वर तिप्पनवार, फेरोज कुरेशी, बाकीं सेठ, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, जेष्ठ पत्रकार सय्यद मन्नान भाई, अनिल नाईक, आहद भाई, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
त्यानंतर २६/११ च्या हल्ल्यात व देशभरातील शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहण्यासाठी येथील आंबेडकर चौकातील मैदानात सांस्कृतिक कला मंचाचे संचालक स.अखिल यांच्यातर्फे आयोजित "कुछ याद उन्हे भी करलो" या बहारदार देशभक्तीपर गीतांच्या मुख्य कार्यक्रमाला कलाकार बाबू भाई आणि सुजाता खडे यांनी "हर करम अपना करेंगे.... ऐ वतन तेरे लिये.... दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये... या गीताने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एकापेक्षा एक सरस अश्या देशभक्तीपर गीतांनी शाहिद वीर जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी गीत गायक कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आशीर्वाद मिळविला.
त्यानंतर संचालक, गायक कलाकार सय्यद अखिल भाई यांनी संविधानावरील गीत "छाती ठोकून सांगू जगाला" हे गीत सादर केले. गायक कलाकार शे. वकील यांनी "जिंदगी मौत ना बन जाये... संभालो यारो... खो रहा चैनो अमन.. मुश्किली मी है वतन"..., गायक कलाकार सुजाता खडे यांनी "ऐ मेरे वतन के लोगो.... जरा आँखो में भर लो पाणी...जो शाहिद हुए है उनकी.... जरा याद करो कुर्बानी".... गायक कलाकार इजाज खान यांनी "तू हिंदू बनेगा..ना मुसलमान बनेगा... इन्सान कि औलाद है इन्सान बनेगा"... गायक कलाकार शे मुख्तार यांनी "कर चले हम फिदा जाणों तन साथियो"....बाल कलाकार सय्यद शोएब स.अखिल याने सुद्धा उत्कृष्ट आवाहजत गीत सादरकरून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
तसेच विविध देशभक्तीपर गीत आपल्या मधुर गाऊन कलाकार स.अखिल, बाबू भाई, सुजाता खडे, शे. वकील, एजाज खान, शेख बबलू भाई, अब्दुल मतीन, बाल कलाकार सय्यद शोएब स.अखिल, आदीनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी भारत माता कि जय.... वीर जवान अमर रहेंच्या घोषणांनी शहर दुमदुमले होते. मोहम्मद अन्वर यांनी कार्यक्रमाचे बहारदार शेरशायरीच्या अंदाजात प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी सरगम सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने आयोजित उल्लेखनीय कार्यक्रमाबाबत अनेकांनी अभिनंदन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शे.नादार भाई, शे.रमजान, रितेश बोड्डेवार, श्याम भारती, राहुल लोणे, सय्यद जिलानी, शे.बाबा,शे.जुबेर आदींसह अनेक मित्रमंडळींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी देखील बंदोबस्त लावून महत्वाची भूमिका पार पडली.