हदगाव/हिमायतनगर। जेष्ठ नाट्यकलावंत मुरारी नरसिंगा चेपुरवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 2 वाजता मूळ गाव वाळकी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे. त्यांच्या निधनाने एक हुरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्यानं वाळकी गावाचं मोठं नुकसान झालं आहे.
त्यांना लहानपणी पासून नाटकांची आवड होती लोककलावंत म्हणनु काम करताना त्यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यात शेकडो नाटक सादर करून गाजवून सोडले होते. त्यांच्या गाजलेल्या,,,, बाईला सुचलं,, कारस्थान फसलं...... साधू मठाचे गुपित,,, यांसह विविध नाटकातून ते संपुर्ण महाराष्ट्रात ओळखले जात होते. त्यांनी विविध विषायवर नाट्य लिखीत करुन सादर केले होते. नाटकात त्यांनी विविधांगी भुमिका साकारून एक ग्रामीण कालावन्त म्हणुन ख्याती मिळविली. त्यांचं कलेची दाद देत मोठं मोठया लग्न कार्यात देखील त्यांना आमंत्रित केलं जायचं, चेपूरवार वाळकीकर येणार म्हंटल की, अनेकांना उत्सुकता असायची, इसाई देवीची वाळकी येथील रहिवासी असल्याने मुरारी चेपुरवार यांनी गावावर गित लिखान केले.
नांदेड जिल्हातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या इसाई देवीची कृपा सगळ्यावर.... वाळकी लई गुलजार.... इसाई देवीची कृपा सगळ्यावर.... असे गित त्यांनी लिखान करुन वाळकी बाजार गावाचे नावलौकिक केलं. त्यांच वृद्धापकाळाने झालेल्या निधनामुळे गावचा हुरहुन्नरी कालावन्त काळाच्या पाडद्याआड गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 2 वाजता वाळकी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे. त्यांच्या मृत्यूपश्चात दोन मुली, एक मुलगा, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
श्री लोकरंजन नाट्य मंडळ वाळकी बाजार या नावाखाली हदगाव हिमायतनगर सह नांदेड यवतमाळ जिल्हा गाजविला होता. त्यांनी केलेली पुढील नाटक ज्यात 1) दोन गडी.... बारा भानगडी,,,, 2) बाईला सुचलं,, कारस्थान फसलं,,, 3) साधू मठाचे गुपित,,, 4) पोर फाकडी हजार लफडी,,, 5) हे गाव लई न्यार, खंडोबाची आण,,, 6) हैलो मी चेयरमान बोलतोय,,, 7) जावंयाचा हात मुलीच घात,,, 8) घरात झगडा संसार उघडा,,, ही नाटके खूप गाजली होती. त्यावेळी नांदेडच्या सिल्व्हर नाईट ऑर्केस्ट्राने देखील यांच्या नाट्यप्रयोगाची धास्ती घेतली होती. अशी माहिती संभा सखाराम हटकर, देविदास नामदेव कदम यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.
स्व. मुरारी चेपूरवार यांनी सर्व नाटक मंडळींचे संचालक म्हणून 55 वर्षापर्यंत काम पाहिले आणि नामवंत शहरात नाटके सादर केली होती. त्यांच्या सोबत नाटकात विठ्ठल टोपलवाड, संभाजी हटकर, देविदास नामदेव कदम, कबीर कदम (कलाट मास्टर), नारायण शिरसाठ डोरलीकर (डायरेकटर), वामन टोपलवाड, पांडुरंग जाधव, माधवराव कदम, गोविंद कदम, विषवनाथ कदम, नागोराव पवार, शिवाणीकर, भीमराव कदम, श्रीराम मोरे वाळकी बु, अशोक महाराज आष्टीकर, पेटी मास्टर, चंपत सवातकर, ल्याहरीकर, मधुकर शेळके, डोरलीकर (ढोलकीपटू), किसन कल्याणकर बोरगावकर, साहेबराव आडे, चांदू ससाणे बोरगावकर, शंकर काळे, मारोतराव कदम, पांडुरंग रावते, सुभाष गायकवाड, यादव गायकवाड, उत्तम गायकवाड, आदींनी त्यांच्यासोबत नाटकांत काम केलं, यापैकी सात जणांचं निधन झाल, त्यानंतर नाट्यप्रयोग थांबले.