बघ्याची भूमिका घेणारे अभियंता यांचेवर कारवाई कधी होणार - शुद्धोधन हनवते
नांदेड, अनिल नाईक| हिमायतनगर रेल्वे वसाहतीच्या बांधकामावर विजचोरी करणाऱ्या डी.एम. दहिफळे आणि विवेक इंजिनियरिंग यां दोन गुत्तेदारावर सहाय्यक अभियंत्याच्या फिर्यादीवरून भोकर पोलीस डायरीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल महिन्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने यासाठी उशीर का..? करण्यात आला असा सवाल नियमानुसार देयके भरणाऱ्या सर्वसामान्य वीजग्राहकांना पडला आहे.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता पवन भडंगे यांच्या अखत्यारीत येणाऱ्या हिमायतनगर कार्यक्षेत्रात असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामासाठी अनधिकृत रित्या विजेची चोरी करून डी.एम. दहिफळे आणि विवेक इंजिनियरिंग चे ठेकेदाराने महावितरणला चुना लावला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर कनिष्ठ अभियंता यांनी वीजचोरी निर्णय ठेकेदारावर जुजबी कार्यवाही करण्यासाठी सुरुवातीला जनरेटर असल्याचे दाखवून कार्यवाहीला सौम्य करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यास लागणाऱ्या लाखो रुपयाच्या दंडापासून वाचविण्याचा केविलवाणा प्रकार केल्याचे त्यांच्या प्राथमिक तपासावरून दिसून आले होते.
या ठिकाणी होत असलेल्या वाढीव इमारतीच्या बांधकामात १०० हुन अधिक निवासस्थानाचे बांधकाम केले जात असून, या बांधकाम करणेकामी गज कापण्यासाठी वापरण्यात येणारी विजेवरील ग्लाइण्डर मशीन, हॅन्ड ग्लाइण्डर, वेल्डिंग मशीन, आणि रात्रीची देखभाल होण्यासाठी पथदिवे, एलईडी फोकस, सर्व विजेवर चालणारी साहित्यासह क्युरिंगसाठी लागणाऱ्या पाणी काढण्यासाठी मोटार पंपांचा देखील वापर झाला होता. कार्यवाहीनंतर यातील बहुतांश साहित्या येथून गायब करण्यात आली असून, याबाबत विचारणा केली असता वेल्डिंग मशीन बांधकामाला कश्याला लागते असे प्रतिउत्तर सहाय्यक अभियंत्याने पत्रकारांना दिले होते. त्यामुळे कनिष्ठ अभियंता व वीजचोरी ठेकेदाराची १८ महिन्यापासून मिलीभगत होऊन वीजचोरी झाली असल्याचे यातून स्पष्ठ होत आहे. येथे अभियंता कार्यरत असताना ठेकेदाराने संमतीशिवाय वीजचोरी करणे शक्यच नाही. त्यावरून संबंधित अभियंता हे वीजचोरी ठेकेदाराला यातून वाचविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संशय निर्माण झाला आहे. याकडे महावितरणच्या अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
या सर्व बांधकामासाठी फुलेनगर गावठाण डि.पि.वरून आलेला लघुदाबाच्या हेद्रे यांच्या शेतातील घराजवळील पोल वरून थेट तार जुन्या दूरसंचार विभागाच्या पोलपर्यंत ओढून त्यास बिनदिक्कतपणे वायर लावून दररोज शेकडो K.W. विजेचा वापर केला जात होता. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून म्हणजे २० महिन्यापासून सुरु असताना स्थानिक अभियंत्याने याबाबत का..? कार्यवाही केली नाही असा सवाल मजदूर पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष शुद्धोधन हनवते यांनी उपस्थित केला. त्यामुळे संबंधित प्रभारी सहाय्यक तथा कनिष्ठ अभियंता, लाईनमन व ठेकेदार यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याने त्यांनी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून वीजचोराला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाहीतर ज्यांच्या कार्यक्षेत्रात वीजचोरी झाली त्यांनाच हा तपास दिल्या गेल्याने या वीजचोरीत मोठी हेराफेरी झाली असल्याचा आरोपही तक्रारकर्ते यांनी केला आहे.
या तक्रारीनंतर जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रेल्वेस्थानक परिसरात गेल्या दोन वर्षापासून अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानसाठी इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणारी वीज चोरी करून वापरली जात होती. हा प्रकार काही जागरूक पत्रकार बांधवांनी उचलून धरल्यामुळे संबंधित ठेकेदारावर अंदाजे १८ लक्ष ५६ हजार ५५० रुपये दंड भरण्यात यावा अन्यथा महावितरणतर्फे एफआयआर दाखल करण्यात येईल अशी नोटीस हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांनी संबंधित कंत्रादाराना बजावली होती. यानंतर महिन्याभराने दंडाची रक्कम न भरल्याने डी.एम. दहिफळे आणि विवेक इंजिनियरिंग यां दोन गुत्तेदारावर सहाय्यक अभियंता पवन पुरभा भडंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आणि पंचनाम्यासह इतर जप्ती बाबतच्या दिलेल्या पुराव्यावरून दि.१८ नोव्हेंबर रोजी भोकर पोलीस डायरीत भारतीय विद्दुत कायदा २००३ कलम १३५ अन्वये वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजचोरी होतेय ही बाब संबंधित प्रभारी सहाय्यक अभियंता यांना माहीत होऊ शकत नाही. हे नवलच आहे कारण रहदारी व एवढ्या मोठ्या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी १८ महिन्यापासून चोरून वीज वापरली जाते ही बाब गंभीर असून, या वीज चोरीला एक प्रकारे ठेकेदाराला अभय देत समर्थन केल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता तथा कनिष्ठ अभियंता शहर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे. तसेच ३ वर्षापेक्षा अधिक काळ या याठिकाणी ठाण मांडून बसल्यामुळे तात्काळ त्यांची उचलबांगडी करण्यात यावी. त्यांच्या जागेवर आणि रिक्त असलेल्या अन्य महावितरण अधिकाऱ्यांच्या जागा भरून नियमित वीजबिल भरणाऱ्यां वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा. अशी मागणी करून लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही मजदूर पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष शुद्धोधन हनवते दिला आहे.