हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सिबदरा व कार्ला पी रस्त्याचा अनेक वर्षापासूनच प्रश्न सुटणार आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आ.माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.
प्ररामा - १० ते सिबदरा किमी. ० ते २.५२० किलोमीटर यामध्ये २.३०० किलोमीटर डांबरीकरण व गावातील २२० मीटर सिमेंट काँक्रेट रस्ता, नाल्यावरील १२ मीटरचा स्लॅब पूल व २ नळकांडी पुलाची मंजुरी मिळाली असून, यासाठी १ कोटी ५५ लक्ष रुपयाचा निधी खर्च केला जाणार आहे.
तसेच प्ररामा १० ते कार्ला पी ०/० ते १४३० मीटर रस्त्याची पैकी ११८० मजबुतीकरण व डांबरीकरण व २५० मीटर गावातील रस्त्याचे सिमेंट काँक्रेट रस्ता व नळकांडी पूल, नाल्यावरील १२ मीटर लांबीच्या स्लॅब पूल एकूण अंदाजित ८७.६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर दोन्ही रस्त्याचे कामाचे युद्घानं लवकरच होणार असल्याची माहिती माजी जी.प.सदस्य सुभाषदादा राठोड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली.