पानभोसी त राजकीय चढाओढी; निवडणुकीसाठी "उडी " - NNL


लोहा|
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणूक आरक्षण निश्चिती पुढील महिन्यात होणार आहे पण लोहा कंधार  तालुक्यात या होणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छूकांची मोठी यादी दिसते आहे .दोन्ही तालुक्यात  खुल्या व ओबीसी जागेवर तगडी लढत होण्याची शक्यता आहे  .यातच पानभोसी   गावात  राजकीय चढाओढी .. पाडपाडी...पडपडी  ... पण आगामी निवडणुकीत घ्यायची "उडी "  अशी ह इच्छूकांची संख्या अधिकची दिसते  आहे.

लोहा कंधार या दोन्ही तालुक्यात १२जिल्हा परिषद व २४पंचायत समितीच्या जागा आहेत. बहुतांश सदस्य हे ज्या पक्षाकडून निवडून आले आहेत त्या पक्षात नाहीत असे प्रमुखांच्या बाबतीत झाले आहे. त्यामुळे कोणीच कोणा विरुद्ध पक्षनिष्ठेवर टीका टिप्पणी टोकाची करणार नाहीत अशी राजकीय परिस्थिती आज ( अपवाद एखादं-दुसरे).पानभोसी हे राजकीय दृष्टया जिल्ह्यात महत्त्वाचे गाव  या भागातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार राहिलेले ऍड ईश्वरराव भोसीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांचे हे गाव. थोरले भोसीकर ईश्वरराव ( काका) व धाकटे भोसीकर  हरिहरराव (पुतणे ) यांच्या नंतर विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून  दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे शिवा नरंगले यांचे ही हेच गाव आहे.हे सगळे बरोबर राहतात पण एकमेकांची ओढाओढी..पडपाडी  करण्यात तसे हे गाव तरबेज आहे .

थोरल्या भोसीकरांची तिसरी पिढी पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्यास इच्छूक आहे.प्राचार्य राजीव भोसीकर यांचा मुलगा महेश हा निवडणूक लढविण्यास तयार आहे .तशी तयारी त्याने सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर व माजी जि प सदस्य वर्षा भोसीकर यांचे चिरंजीव कृष्णा हेही निवडणूक लढविण्याचा तयारीत आहेत. भोसीकर दाम्पत्य गेल्या काही दिवसा पासून सार्वजनिक कार्यक्रमात कृष्णा ला घेऊन फिरत आहेत.तर प्राचार्य यांनीही मुलाच्या राजकीय प्रवेशासाठी योग्य वेळ व संधी शोधली आहे. 

संजय भोसीकर हे सुद्धा जि प निवडणूक लढविण्याचा तयारीत आहेत( दोघा पैकी एकजण निवडणूक लढवतील) धाकटे भोसीकर म्हणजे हरिहरराव भोसीकर यांचे चिरंजीव शिवकुमार व बाळासाहेब या दोन्ही बंधूनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. हरिहररावांचे धाकटे भाऊ मनोहर पाटील भोसीकर हे लोहा तालुक्यातून निवडणूक रिंगणात उतरण्यास दंड थोपटून आहेत. म्हणजे भोसीकर भावाची काका पुतण्याची तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे प स सदस्य व वंचित जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी जि प किंवा प स निवडणूक लढविण्या बाबत अद्याप आपले पत्ते ओपन केले नाहीत.पानभोसीत चढाओढी -निवडणुकीत "उडी " असे राजकीय वातावरण तयार होत आहे

पानभोसी बरोबरच बहादरपूरा, चिखली, हाळदा, लोहा , अंतेश्वर, सोनखेड , दक्षिण नांदेड मधून आ मोहन अण्णा हंबर्डे यांचे चिरंजीव अशी प्रमुख युवा नेते -कार्यकर्ते यावेळी निवडणूक रिंगणात असतील असे वातावरण तयार झाले आहे. तर शहरातून चला खेड्या कडे असाही नारा दिला जातो आहे. एकंदरीत यंदा लढती अटीतटीच्या आणि राजकीय अस्तित्वाच्या  झाल्यास नवल ते काय ..असे चित्र आरक्षण सोडती पूर्वी आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी