शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लक्षात घेऊन वीज पुरवठा खंडित नं करण्याच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिल्या सूचना
हिमायतनगर, अनिल नाईक| नांदेड जिल्ह्यातील हदगाव/हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची सक्तीने होत असलेली वीजबिल वसूल थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. त्यांनी तातडीने निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्याकडून सवलतीने वीजबिल वसुली करावी आणि वीज कनेक्शन कापू नयेत अश्या सूचना संबंधित विभागाच्या मुख्य अभियंत्यास केल्या आहेत.
हदगाव- हिमायतनगर तालुक्यात रब्बी हंगामाच्या सुरुवाती पासून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन कात करून वेठीस धरण्याचा प्रकार सुरु केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. महावितरणने जी शेतकऱ्याकडून वसुली सुरू केली होती त्या उपलब्ध झालेल्या शेतकऱ्यांच्या टक्करी लक्षात घेऊन माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज मा.ना.नितीन राऊत साहेब ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली.
आणि हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी, पुरामुळे अगोदरच अडचणीत आला आहे, त्यामुळे तो हैराण झाला असून, रब्बीच्या पिकावर खरिपात झालेले नुकसान भरन काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हि झालेली परिस्थिती लक्षात घेऊन हदगाव हिमायतनगर मधील शेतकऱ्यांच्या समस्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सक्तीच्या वीजबिल वसुलीत शेतकऱ्यांना सवलत दिली तर शेतकरी पुन्हा उभा राहील आणि टप्प्या टप्प्यात महावितरणची देयके भरेल हे पटवून दिले.
मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या समस्या व माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी सुचविलेली सूचना लक्षात घेत त्यांनी लागलीच नांदेडच्या sc ला फोन करून शेतकऱ्यांना त्रास न देता सवलती दरामध्ये ७ ते १० हजार ऐवजी ४ ते ५ हजारा पर्यन्त वीजबिले भरून घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा. आणि सक्तीने कोणत्याही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये अश्या सूचना दिल्या असल्याची माहहती माजाची आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी दूरध्वनीवरुन बोलताना दिली. त्यांच्या या मागणीमुळे हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, आर्थिक संकटात आलेल्या अनेक शेतकरी बांधवाना आधार मिळणार आहे.