हिमायतनगर| अखिल भारतीय आदिवासी मन्नेरवारलू समाज संघटना सिबदरा (ज)ता.हिमायतनगर जि.नांदेड तर्फे दिनांक 18 नोव्हेंबर 2021 भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनबा ताडेवाड, उपाध्याक्ष श्री.प्रभाकर महाराज बाचकल्वाड, प्रमुख पाहुणे म्हणून कोळी राष्ट्रसंघ नांदेड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण जंगेवाड, गावचे सरपंच यांचे प्रतीनिधी म्हणून सुधाकर भदेवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोती बोल्पेलवाड, देवस्थान कमितीचे अध्यक्ष दतलाल जयस्वाल, उपसरपंच विनायक जंगेवाड, कोतवाल आनंदा चेनेरलू यांची उपस्थिती होती. यावेळी शिवाजी बाचकलवाड व श्री.प्रभाकर बाचकलवाड यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा इतिहास कथित केला.
यावेळी लक्ष्मण जंगेवाड म्हणाले की, आदिवासी मंन्नेरवारलू समाज व कोळी महादेव समाज हा खऱ्या अर्थाने आदिवासीच आहे. यांना सवलती न मिळू देण्याचे काम मूळ आदिवासी संपूर्ण समाज बांधव करत नसून त्यामगे आदिवासी समाजातील काही मोठ्या नेत्यांच्या हाथ खालील उच्च वर्ग अधिकारी आणि काही राजकीय दलालांचा हाथ असून, हे दलाल आदिवासी समाजाला मिळणारा निधी त्यांच्या पर्यंत पोहचू देत नाहीत. संपूर्ण आदिवासी समाजाला मागास ठेवण्याचं षडयंत्र आदिवासी समजतील काही अधिकारी करत असून, ही बाब सर्वच आदिवासी पोट जातीनी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. अशा दलालाना न भिता समाज बांधवांनी आपले मुलांचे जात प्रमाणपत्र योग्य ते उपलब्ध कागद पत्रे फाईल ला जोडून प्रमाणपत्र काढून घ्यावे..काहीही अडचण आल्यास संबधित संघटना चा पाठिंबा घेऊन आपल्या मुलांना चांगले शिक्षण व योजाचा लाभ घ्यावा...असे आव्हान त्यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना केले.
यावेळी बजरंग दल शाखा प्रमुख श्री परमेश्वर दताजी बाचकलवाड, संजय पांडुरंग बाचकलवांड,दिगंबर बाचकलवाड, प्रकाश भदेवाड, नामा बोलेवाड, दिगंबर बाचकलवाड, भगवान बाचकलवाड, विश्वनाथ पाटील बाचकलवाड, दत्ता बाचलकलवाड,रामेश्वर बाचकलवाड, दिगंबर मोघलवाड, संजय श्यमलवाड, दिगंबर राहुलवाड, दत्ता राहुलवाद, शिवाजी श्यामलवाड, उत्तम पाटील, राजाराम पाटील, माधव बोलपेलवाड, संतोष कोलकंतवाड ,गोपाळ बाचकलवाड ,शंकर बाचकलवाड, रमेश घोसलवाड, आदेश सुदेवाड, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन, शिवाजी बाचकलवाड, संतोष बाचकलवाड, योगेश बाचकलवाड, अर्जुन बाच्कलवाड, श्रीअनंत, अर्जुन, सूरज बाचकलवाड,रोहन ताडेवाड नागेश श्यमलवाड,संतोष श्यमलवाड यांनी केले.