आ.सतीश चव्हाण ‘यूपीएससीत’ यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला -NNL


नांदेड|
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाला नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी नुकतीच नांदेड येथे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी सदिच्छा भेटी देऊन पालकांचा सत्कार केला.

नांदेड शहरातील रजत कुंडगीर, बाभूळगाव येथील शिवहार मोरे व सुमितकुमार धोत्रे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 600, 649, 660 वा रँक मिळवत यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. तीन्ही विद्यार्थी सध्या दिल्ली येथे असल्याने आ.सतीश चव्हाण यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. मात्र या यशात मोलाचा वाटा असलेले शिवहार मोरे यांचे वडील चक्रधर मोरे, रजत कुंडगीर यांच्या आई शकुंतला कुंडगीर, भाऊ शुभम कुंडगीर, सुमितकुमार धोत्रे यांचे वडील दत्ताहरी धोत्रे, आई सुर्यकांता धोत्रे यांच्या भेटी घेऊन आ.सतीश चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला. 

मराठवाड्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून जिद्द, चिकाटी व इच्छा शक्तीच्या जोरावर कुठलेही क्लासेस न लावता अनेक विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला वस्तूपाठ या विद्यार्थ्यांनी घालून दिला असल्याचे याप्रसंगी आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, प्रा.डी.बी.जांभरूनकर, प्रा.मझरूद्दीन, यशवंत कांबळे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी