नांदेड| गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात नदीकाठावरील आणि उपाट्या ठिकाणच्या जमिनीतील पिके पाण्याखाली गेली. या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक नेस्तोनाबूत केले. त्यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे हि बाब लक्षात घेता मराठवाड्यासह नांदेड जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहिर करून शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश मोर्चाच्या नांदेड जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
नुकत्याच झालेल्या सप्टेंबर - ऑगस्ट महिन्यातील मुसळधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मुंग, उडीद, भुईमूग सह आदी पिके नामशेष झाली आहेत. तर, तर कापूस, मका, उस, मोसंबी, बाजरीचे पीक आडवी पडले असून, शेतकऱ्यांच्या शेतात कमरेच्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे कपाशी लाला पिवळे पडले असून, कापसाची बोन्डे काळी झाली आहेत. जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले दुथडी वाहत असून, अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे उभे पिके वाहून गेली आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सामना करावा लागला आहे. काही ठिकाणी जमिनीसह पिके वाहून गेली मात्र अद्यापही पंचनामे पूर्ण झाली नाहीत. अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार..? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे पंचनामे न करता शासनाने त्वरित मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करून सरसकट आर्थिक मदत करत प्रत्येक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश मोर्चाच्या नांदेड जिल्हाध्यक्षा सौ.सीमा स्वामी लोहराळकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.