किनवट पंचायत समिती समोर ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण -NNL

गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी रोजगारसेवक यांच्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे दिले आश्र्वासन 


किनवट|
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम स्वरूपी करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंती दिना निमित्त महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ज्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा जनक मानले जाते त्याच महाराष्ट्रातील रोजगार सेवक हा न्याय हक्कासाठी लढा लढत आहे. गेली चौदा पंधरा वर्षे झाले शासनाच्या अनेक विविध योजना घरा घरात व शेती च्या बांधावर  पोचवण्यासाठी त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे.तसेच गोरं गरीब जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी जिवन दायी असलेल्या रोजगार हमी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जो रात्रदिवस झटून आपल्या रक्तचे पाणी करतोय,त्याच्या पोटावर लाथ मारण्याचे काम इतली शाशन व्यवस्था करत आहे. शेतकरी व मजूर कुटुंबाला आर्थिक बाबतीत संपन्न करण्यासाठी सुखाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यांच्या मुलाबाळांचा विचार आजपर्यंत कोणत्याही सरकारणे केला नाही.

राज्यामध्ये सन 2006 पासून आजपर्यंत राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक हे शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या तुलनेत 4.%6% अशा तोडक्या मानधनावर काम करत आहेत.ते पण मानधन सहा सहा महिने वेळेवर मिळत नाही.त्यात ग्रामपंचायत खात्यामध्ये मानधन जमा होते.सरपंच, ग्रामसेवक वेळेवर चिरीमिरी घेतल्याशिवाय चेक देत नाहीत नाही दिल्यास चेक देण्यात टाळाटाळ करत असतात.रोजगार सेवक यांना स्वताच्या मैहनतिचे पैसे मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हिच मोठी शोकांतिका रोजगार सेवक यांच्या वाट्याला आली आहे. ग्रामपंचायत मध्ये नविन सरपंच उपसरपंच निवड झाल्यानंतर मागील राग मनात ठेवून सुड बुद्धीने ग्रामरोजगार सेवक यांना खोट्या प्रोसिडींग द्वारे कामातुन कमी करून मानसिक त्रास देणे अशा प्रकारास बर्याच जणांना सामोरे जावे लागते.


भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्रातील 28144 ग्राम रोजगार सेवक यांच्या एक जुटीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण विविध मागण्या संदर्भात ठेवण्यात आले.निवेदनाच्या निवेदनाचा सहानुभूती पुर्वक विचार सरकारने करावा अन्यथा पुढच्या वेळी उग्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येणार असल्याचे किनवट तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष मा.गेमशिग जाधव यांनी सांगितले. यावेळी उपोषणाला बसलेल्यां मध्ये मधुकर गवले, बापूराव वावळे, राहुल पाटिल, ज्ञानेश्वर मुंडे पुंडलिक घुगे, नामदेव सावरकर, अरूण राठोड, मनोज केंद्रे, बालाजी राठोड, किरण राठोड, संजय राठोड, राम जाधव, साहेबराव दार्लावार, अशोक जाधव, संजय मिराशे, कृष्णा आत्राम, संदिप सलाम, सचिन राठोड, तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपोषणाला उपस्थितीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी