लतादीदींना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार जाहीर -NNL


नांदेड|
धर्म, संस्कृती, इतिहास आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने 'जिजामाता विद्वत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे हे ४० वे वर्ष असून यंदाचा पुरस्कार गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रदान केला जाणार आहे. १ लाख ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शिवकथाकार तथा छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सद्गुरूदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख, छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख, सचिव भालचंद्र देशकर यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे पुरस्कार वितरणाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाही. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने आतापर्यंत चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, सेतूमाधवराव पगडी, गो. नी. दांडेकर, रा.स्व.संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस, धुंडा महाराज देगलूरकर, पद्मविभूषण तथा महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पंडित महादेवशास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह ३८ मान्यवरांना 'जिजामाता विद्वत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी