नांदेड| नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व कै. सोपानराव तादलापुरकर क्रीडा मंडळाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ( दि. २ ते १० आक्टोबर ) दरम्यान नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी व्यसनमुक्ती सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. दि. २ आक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता नांदेड शहरातील म. गांधी पुतळा येथे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करुन सप्ताहाला सुरुवात झाली.
संयोजक तथा नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक कैलास गायकवाड यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री अशोक चव्हाण, आ. अमर राजुरकर, डॉ. सुनील कदम, गणेश तादलापुरकर, कल्पना डोंगळीकर, माहेश्वरी गायकवाड, दिगंबर शिंदे, सिंधु देशमुख, नेहरू युवा केंद्र संचालीका चंदा रावळकर, प्रकाश सोनकांबळे, विशाल इंगोले, शिवशंकर मुळे, साधना गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमात वर्षा विद्याविलास, अमोल मडामे यांनी सप्ताहाचे महत्त्व विशद केले. पालकमंत्री चव्हाण यांनी नशाबंदी मंडळाचे व कै. तादलापुरकर क्रीडा संस्थेच्या माध्यमातून घेतलेल्या या व्यसनमुक्ती सप्ताहाला शुभेच्छा दिल्या. व नांदेड जिल्ह्यातील होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री चव्हाण दिले.