नांदेड| येथील प्रसिद्ध चित्रकार आणि सृजन कम्युनिकेशन्श, पब्लीकेशनचे संचालक नयन बाराहाते यांचे बुधवार दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता राहते घर, तरोडेकर मार्केटच्या मागे, वजिराबाद, नांदेड येथून निघणार आहे. त्यांचे पार्थिव सध्या सृजन कम्युनिकेशन्स, खंडेलवाल प्लाजा, वजिराबाद येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
माझा जिवाभावाचा मित्र आणि नांदेडच्या कला क्षेत्रातील तारा निखळला - हेमंत पाटील
नांदेडच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे नयन बाराहाते होय. आपल्या प्रतिभावान कलाविष्काराने समृद्ध करणारा तेजस्वी तारा आज निखळला. अशा शब्दात हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत सृजनशील चित्रकार नयन बाराहाते यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नांदेडच्या सांस्कृतिक भव्य नकाशावर , लोकप्रियेतच्या कळसावर त्यांचं नाव लिहलेलं होत. रंग , रेषा आणि चित्र हे त्यांच्या अभिव्यक्तीचं मुख्य साधन होतं , केवळ सृजनशील कलाकार अशी त्यांची ओळख मर्यादित नव्हती तर शब्दांच्या माध्यमातून चित्रांना बोलकं करण्याची अद्वितीय कला त्यांना ईश्वराने प्रदान केली होती. माझ्या राजकीय क्षेत्रातील प्रवासात सांस्कृतिक कामाचे योगदान फार मोठे आहे. या सांस्कृतिक कामात जिवाभावाचा मित्र म्हणून मोठी साथ मला नयन ने दिली होती.
मग आषाढी ,गोदावरी महोत्सव असो की सामाजिक संदेश देणारे अनेक उपक्रम असुदेत यामध्ये मोठी मदत नयन च्या अफलातूल कलेतून झाली आहे.दरम्यानच्या काळात त्यांना झालेल्या आजारावर त्यांनी प्रचंड आत्मविश्वासाने मात करून पुन्हा नव्या उमेदीने आपल्या कामाला सुरवात केली होती. हे खरचं अविश्वसनीय होते.पण अचानक आज त्याचे जाणे मनाला न पटणारे, अश्या माझ्या मित्राला चिरंतन शांती लाभो. हिच भावपूर्ण श्रद्धांजली .