हिंगोली, दिनेश मुधोळ| हिंगोली नगर पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शनिवारी ता. दोन घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत १७ वर्षा खालील मुलांच्या गटात नागपूरच्या साहील लहाने तर मुलींच्या गटात जिंतूरच्या सायली शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावरून शनिवारी या स्पर्धेला सुरवात झाली या स्पर्धेचे उदघाटन आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ, अजय कुरवाडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अभियंता रत्नाकर अडशिरे, बाळू बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत ४० वर्षावरील गटात प्रथम गगन भट, द्वितीय संतोष मस्के, तृतीय धिरज जयस्वाल, चौथे सुधीर देशमुख ( सर्व रा. हिंगोली ) यांनी यश मिळविले आहे.
१७ वर्षा वरील पुरुषांच्या गटात प्रथम छगन बोंबले ( खांबळा ), द्वितीय शुभम शिंदे (सावा ), तृतीय ऋषीकेश मोरे ( इंचा ), मुलींच्या गटात प्रथम अश्विनी जाधव , निकीता म्हात्रे ( दोघी रा. परभणी ), गायत्री गायकवाड ( वैजापूर , औरंगाबाद ) तर १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम साहील लहाने ( नागपुर ) , द्वितीय ओम कव्हेरकर ( हिंगोली ), तृतीय ओम पोले ( औंढा ), मुलींच्या गटात सायली शिंदे ( जिंतूर ) , शितल जाधव ( औरंगाबाद ) , तृतीय माधवी पानचावके ( उदगिर ) यांनी यश मिळविले आहे.या स्पर्धकांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. परिक्षक म्हणून रमेश गंगावणे , आर . एम . व्यवहारे , नितीन मोरे , अनिल लोळेवार यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला या कार्यक्रमात पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी देशभक्तीपर गित सादर करुन उपस्थितांची वाहवाह मिळविली.