नांदेड| स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समपर्ण अभियान अंतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली जुना मोंढा ते महापालिके पर्यंत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमध्ये अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेल्या यात्रेमध्ये अग्रभागी सुशोभित केलेला तिरंगा रथ होता. खादीचे कपडे परिधान करून तिरंगा ध्वज हातात घेऊन अनेक जण घोषणा देत होते. नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात उंचावल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शेकडो नागरिकांनी फलकावर स्वाक्षऱ्या केल्या. महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री वल्लभभाई पटेल रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याला तसेच महावीर स्तंभाला अभिवादन करण्यात आले.
रस्त्यामध्ये अनिलसिंह हजारी आणि केदार नांदेडकर यांनी तिरंगा यात्रेवर पुष्पवृष्टी केली. तिरंगा रथात बसून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि धीरज स्वामी यांनी यात्रेचे संचलन करत उपयुक्त सूचना दिल्या. यात्रेच्या समारोपप्रसंगी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रवीण साले यांनी मार्गदर्शन केले. तिरंगा यात्रेमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रविण साले, संतुकराव हंबर्डे, चैतन्य बापू देशमुख, अजय सिंग बिसेन, मिलिंद देशमुख जनार्धन ठाकूर अरविंद भारतीया, बालाजी शिंदे, भारतीय श्रावण पाटील भिरवंडे प्रणिता देवरे चिखलीकर विजय गंभीरे,ॲड दिलीपसिंघ ठाकूर, व्यंकट मोकले,अनिल सिंह हजारी, सुशीलकुमार चव्हाण, प्रभू कपाटे, शितल खांडील, बाळासाहेब देशमुख, सिध्दांत धुतराज, अभिलाष नाईक,चंचल सिंग जट, शततारका पांढरे, शिवरानी पाटील, कांचन ठाकूर, मारोती वाघ ,मनोज जाधव.
बालाजी गिरगावकर, जनार्दन गुपीले,राम अय्यर , संजय घोगरे , बालाजी शिंदे, व्यंकटेश जिंदम, अकबर खान पठाण, अनिल जगताप, डॉ सचिन उमरेकर, सचिन रावका, संतोष परळीकर, प्रशांत पळसकर, धनंजय नलबलवार, राजू आंबेकर, संदीप कऱ्हाळे, नवल पोकर्णा, सुर्यकांत कदम, अशिष नेरलकर, हरभजन सिंग पुजारी, चंद्रकांत पत्की, वैजनाथ देशमुख, सुनिल मोरे, किरपाल सिंग हुजुरीया, प्रताप सिंग खालसा, जसबिर सिंग धुपीया, सुनिल राणे, नागनाथ स्वामी, सुनिल निल्लावार,बागड्या यादव,दिगांबर लाभशेटवार, महादेवी मठपती, श्रद्धा चव्हाण, सुषमा ठाकूर, बाळू लोंढे,राज यादव, अक्षय अमिलकंठवार, संतोष गुजरे, संदीप पावडे, मनोज जाधव, बाबुराव लाढ, सोनू उपाध्याय, कामाजी सरोदे, बालाजी सूर्यवंशी, अमोल कुलथीया, केदार नांदेडकर, कुणाल गजभरे, बाळू टोंपे, बबलू गायकवाड, कन्हैया हजारी, किर्ती छेडा, ओमप्रकाश गुडमेवार, माळगे गोपालराव, कुमार मारती, अनिल लालवाणी, राजेंद्र दमाम,नाना मोरे,नरेश अमलचंदणाणी, अरूण काबरा, सुरेश शर्मा कपील यादव व इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.