अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा कळमनुरी येथे भाजपचा एल्गार -NNL


कळमनुरी/हिंगोली,दिनेश मुधोळ|
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रभर सुरू असलेल्या परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलल्या जात नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला शेतकरी हतबल झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यशासनाने खंबिरपणे उभे राहणे गरजेचे असताना ते बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे.

त्यामुळे ता १ रोजी राज्यासह हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तसेच इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडल्यामुळे व कयाधू नदीला महापूर आल्यामुळे या नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इतरत्र उभ्या पिकांना मोड आलेले आहेत. अगोदरच महामारीच्या काळात हतबल झालेल्या शेतकऱ्यावर पुन्हा एक असमानी संकट कोसळले असून, शेतकरी हवालदिल झालेला दिसून येत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लाक्षणीक उपोषण करूण विविध मागण्यांचे निवेदन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कळमनुरी येथील तहसीलदार सुरेखा नांदे यांना देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा आमदार रामराव वडकुते, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, महंत योगी श्याम भारती महाराज, ह भ प महेंद्र मस्के, महाराज, भाजपा ज्येष्ठ नेते अण्णासाहेब मेने, दामूअण्णा शिंदे, तुकाराममामा ढोणे,पी आर देशमुख, पप्पू भाऊ चव्हाण भाजयुमो जिल्हाध्यक्ष, खोब्राजी नरवाडे वसमत ता अध्यक्ष, रुपेश कदम तालुकाध्यक्ष, डॉ वसंतराव देशमुख, बापूराव जाधव पाटील, डॉ जयदीप देशमुख वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष, पुष्पाताई शिंदे महिला आघाडी ता अध्यक्ष, ताल शहराध्यक्ष अशोक संगेकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार, सुरेशराव नांगरे, दिनकर कोकरे उमेश सोमानी, विक्रम शिंदे, अमिष दरक, संजय कावडे, अशोकराव मस्के, राजूभाऊ पतंगे ,जिद्दी उर्फ अंकुश पाटील, पंडित गजभार, अनिल संगेकर, प्रतिक साकळे, डॉ सुधाकर लोमटे, पप्पू पवार, रमेश हाके, मारोतराव देशमुख, चंद्रकांत राऊत, बबनराव पंचलिंगे, नारायणराव डूरे राजू जाधव.

दिलीप सोनटक्के ,बालाजी काळेवार, कुबेर गोरे, पुंजाजी काकडे, विकास जाधव ,उत्तम हरण, हनुमंत सूर्यवंशी ,प्रकाश सूर्यवंशी, कैलासराव शिंदे, विजय चव्हाण, कैलास माधवराव शिंदे, चंद्रकांत सूर्यवंशी, नारायण शेळके, तुकाराम पतंगे, तुकाराम मस्के, गणेश कड, गजानन अलोणे, लक्ष्मण कराळे ,प्रल्हाद देवकते, जगन्नाथ शेषराव, रुस्तुम दांडेकर ,ज्ञानेश्वर मुधळ ,देवराव ढोणे ,बाळू मिराशे ,आनंद काजळे ,किरण कणके, प्रमोद चोतमाल ,गजानन कदम ,विठ्ठल राव भोयर, बालासाहेब हेंद्रे, सतीश पतंगे, अरुण कदम,मसाराव करे,बालाजी गिरी, सोशल मीडिया व आयटी सेल जिल्हाध्यक्ष राहुल मेने यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

माजी आमदार, गजाननराव घुगे
कळमनुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, यासाठी शासनाने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत करावी शेतकऱ्यांना तात्काळ मदत नकेल्यास येत्या काळात भाजपच्या वतीने आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ.

मा आ रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी
अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे या संकटातून उभारण्यासाठी कोणत्याही अटी शिवाय पीक विमा मंजूर करावा शासनाने योग्य पावले उचलावीत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू.

तान्हाजी मुटकुळे, आमदार हिंगोली
अतिवृष्टी होऊन आठ दिवस झाले तरी शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत यावरून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान विषयी आघाडी सरकार किती गंभीर आहे हे लक्षात येते पंचनामे करूनच शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे अन्यथा आमदारांना व मंत्र्यांना घेराव घालु असा इशाराही यांनी दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी