हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील पिकांच्या चुकीच्या आनेवारीत सुधारणा करून सुधारीत आणेवारी जाहीर करावी. सदरील आणेवारी संबंधीत कृषि विभाग महसुल विभागाने पिकांची पाहणी न करता चुकीची आनेवारी काढल्याचा आरोप हदगाव विधानसभा क्षेञाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यानी उपविभागीय अधिकारी याना पत्र देऊन केला.
त्यांनी दि १ आक्टोबर २०२१ ला दिलेल्या पञात म्हटले आहे की, पिकाची सुधारीत आनेवारीची प्रक्रिया करून आणेवारी जाहीर करावी. असे पत्र तालुका कॉग्रेस कमिटीच्या हस्ते उपविभागीय अधिकारी याना देण्यात आले. त्यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष आनंदराव भंडारे, उपनगराक्ष सुनील भाऊ, डॉ रेखाताई चव्हाण, अनिल पाटील, पंजाबराव पाटील, संदीप शिंदे, खदीर,खान, अमित अडसूळ, गोपाळ पवार, किशोर पाटील, दिलीपराव चव्हाण, सुभाष दादा राठोड, संदीप काळबांडे, पांडू खंदारे, संतोष माने आदींसह अनेकांची उपस्थिती होती.