नविन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने नागरी हिवताप विभागा मार्फत पुरपरसिथती ओसरल्यावर रोगराई पसरू नये खबरदारी उपाययोजना म्हणून जंतुनाशक फवारणी व धुरीकरण करण्यात येत आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वंसतराव नाईक महाविद्यालय सिडको,नावघाट पुल,वसरणी, असदवन, सिडको हडको परिसरातील यासह सखल भागातील अनेक भागात रोगराई पसरू नये यासाठी दक्षता घेऊन जंतुनाशक फवारणी व धुरीकरण करण्यात आले.
सदरील मोहीम आयुक्त डॉ सुनिल लहाने व प्रभारी आयुक्त बाबासाहेब मनोहरे व उपायुक्त अजित पाल संधु, स्वच्छता सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे,नागरी हिवताप योजनेचे विभाग प्रमुख गणेश भुसा, व्यवस्थापक राजेश पललेवाड स्वच्छता निरीक्षक अरजृन बागडी,किशन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय वाघमारे,बाबु बिरेवार, व्यंकट मगरे,राजु चोहाण या कर्मचाऱ्यांच्या मार्फत फवारणी व धुरीकरण काम चालू आहे. सदरील मोहीम ही चालुच राहणार असुन सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सर्वच परिसरात होणार आहे,या फवारणी मुळे साथीच्या आजार असलेल्या डेंग्यू, मलेरिया व साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी व बचावासाठी मनपा प्रशासनाचा वतीने वरील ऊपकम चालू आहे.