हिमायतनगरातील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेकडो अर्ज धुळीत पडले - NNL

तत्कालीन पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा अखिल भाईंनी केला आरोप 


हिमायतनगर|
पहिल्या टप्प्यातील घरकुल मंजूर होऊन घरचे स्वप्न साकार होत असंल्यामुळे नगरपंचायत हद्दीतील घरकुल धारकांनी दुसऱ्या टप्प्यात घरकुल मिळतील अशी अपेक्षा धरून प्रस्ताव दाखल केले. घरकुल उपलब्ध होतील असे आश्वासनांचे गाजर दाखउन चकरा मारायला लावल्या मात्र घरकुल मिळाले नाही. सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडून शेकडो नागरिकांनी दाखल केलेल्या प्रस्ताव धूळखात पडले असल्याचा प्रकार माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई यांनी उघड केला आहे. त्यांनी या संदर्भाची माहिती पत्रकारांना देऊन तत्कालीन पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश केला आहे. परिणामी जनतेची दिशाभूल झाल्याने आता वंचितांना आमदार जवळगावकर आणि संबंधित प्रशासक पाठपुरावा करून घरकुल मिळून देतील अशी अपेक्षा आहे.   

हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर काँग्रेसला बहुमत देत नागरिकांनी सतत दिली. प्रथम नगराध्यक्ष म्हणून अखिल भाई यांची निवड झाली, आणि त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पालकमंत्री अशोकराव चव्हाण, आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून तब्बल ३० कोटीहून अधिकचा निधी हिमायतनगर शहराच्या विकासासाठी खेचून आणून स्मशान भूमी, रस्ते, पथदिवे, धार्मिक स्थळाचे सुशोभीकरण, १२२५ घरकुल धारकांच्या प्रस्तावांना मंजुरी आणून शहरातील गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेतली. दरम्यान अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून ओबीसी प्रवर्गासाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सुटले. आणि काँग्रेसमधील काहींनी सत्तेच्या लालचेने काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून अडीच वर्ष शिवसेनेच्या हातात सत्ता दिली. सत्ता हातात येताच पहिल्याच दिवशी नवनिर्वाचितांनी पैश्याची उधळण करत भव्य मिरवणूक काढली होती.      

खुर्चीवर बसल्यानंतर सत्तेच्या चाव्या हातात येताच विकास कामासाठी बंडखोरच्या मदतीने सत्तेवर आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील धडपड करून अंदाजे १२ ते १५ कोटी रुपयाच्या आसपास निधी माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून आणला. आणि शहरात रस्ते, नाल्याची आणि पथदिवे बसविण्याची कामे केली. मात्र त्यांनी केलेली रस्ते नाल्याची कामे अल्पावधीतच धुळीस मिळाली हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही कारण याचे उदाहरण जनता दररोज ये- जा करता पाहते आहे. एव्हडेच नाहीतर गरजू नागरिकांच्या सर्वात जिव्हाळ्याच्या प्रश्न सोडविण्यात चालढकल करत अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे त्यांनी जनतेच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे आज शेकडो लाभार्थ्यांचे दाखल केलेल्या घरकुलधारकांचे प्रस्ताव (अर्ज) मंजुरी अभावी येथील नगरपंचायत कार्यालयात धूळखात पडले असल्याचा आरोप प्रथम नगराध्यक्ष अब्दूल अखिल अब्दुल हमीद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. 


याबाबत त्यांनी संबंधित कुशाग्र असोसिएशन नांदेडशी विचारणा केली आणि प्रत्यक्ष भेट घेऊन याचे कारण जाणून घेतले असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार तत्कालीन शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी आमच्या ५ वर्षाचा करारनामा असताना घरकुलाचे काम करणाऱ्या एजन्सीला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे हे दुसऱ्या टप्प्यातील घरकुलाचे प्रस्ताव (अर्ज) धूळखात पडले असल्याचे म्हंटले  आहे. या धूळखात पडलेल्या घरकुलाच्या बाबतीत मी स्वतः पालकमंत्री अशोकराव चव्हाण, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आणि प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून प्रथम कुशाग्र एजन्सीला मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आणि सदरील धूळखात पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील घरकुलाच्या प्रस्तावाला मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी पत्रकारांना सांगितले. 

पुढे ते म्हणले कि, एक जबाबदार नागरिक तथा लोकप्रतिनिधी असल्याने प्रस्ताव दिलेल्या अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे घरकुल प्रस्तावामध्ये लक्ष घातले असल्याचे सांगत खरे पाहता गरजू लोकांना लवकरात लवकर घरकुल मिळवून देऊन त्यांचे स्वप्न साकार करण्याची  तत्कालीन जबाबदारी सत्ताधाऱ्यांची होती. मात्र त्यांनी केवळ नगरपंचायतीचा पदभार स्वीकारताच ७ लाखाच्या घनकचऱ्याचे टेंडर १५ लाखावर नेले. आमचं काळात पत्रकार भावनासाठी निधी मंजूर करून जागा उपलब्ध करून दिली. मात्र पत्रकार भावांचे काम होऊ नये म्हणून त्यात आडकाठी केली त्यामुळे पत्रकार भवनांचा प्रश्न रखडत पडला आहे. यासह अनेक कामात त्यांनी स्वहित सध्या करण्यासाठी मनमानी कारभार केला आहे. त्याचे उत्तम उदाहरण घरकुलाचे प्रस्ताव धूळखात पडल्याचे आहे. असे अनेक प्रकरने त्यांनी आपला स्वार्थ सध्या होत नसल्याने प्रलम्बित ठेवले आहेत. एकएक करत या सर्व प्रकरणाचा मी पर्दाफाश करून शहरातील विकासप्रेमी जनतेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अब्दुल अखिल भाई म्हणाले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी