टेभीच्या माळातून मुरूम चोरणार्यावर कार्यवाहीसाठी टाळाटाळ; गौण खनिज चोरी सुरूच -NNL

अन्यथा मराठा साम्राज्य संघ उपोषणाला बसण्याच्या तयारीत 


हिमायतनगर, अनिल नाईक| 
तालुक्यातील टेभी रस्त्यावर असलेल्या अबाबाकरच्या टेकडीला पोखरून मुरुमाचे उत्खनन करून पांडवकालीन ऐतिहासिक वास्तूला बाधा पोचविण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराने आणि राजकीय वरदहस्त असलेल्या शहरातील काही माफियांनी गेल्या महिन्याहारापासून सुरुवात केली आहे. याबाबत तक्रारी देऊनही स्थानिक तहसीलदारांनी कोणतीही कार्यवाही ना करता गौण खनिज काढणाऱ्या जेसीबी मशिनी सोडून देऊन मुरुमाची  चोरी करणार्यांना अभय दिले आहे. हिंदू - मुस्लिम बांधवांची धार्मिक आस्था असलेल्या टेकडीचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ निर्माण करावे. आणि या टेकडीच्या करण्यात आलेल्या उत्खनन प्रकरणाची एटीएस मशीनद्वारे चौकशी करून जेसीबी, वाहने जप्त करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मराठा साम्राज्य संघ महाराष्ट्र राज्याचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष माधव शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी दि.११ रोजी जिल्हाधिकारी नांदेड याना निवेदन देऊन केली आहे.

हिमायतनगर - टेभी रस्त्यावर पांडवकालीन गुफा असलेली उंच टेकडी असून, या टेकडीमुळे शहराच्या वैभवात भर पडली असून ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. याच टेकडीच्या बाजूला अबाबकरचे तीर्थस्थान आहे. त्यामुळे हि टेकडी पांडवकालीन ऐतिहासिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहे. मागील २५ ते ३० वर्षपूर्वी या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षलागवड करून टेकडीचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न केला असल्याने येते हिरवीगार झाडे असल्याने या वनात मोठ्या प्रमाणात ससे, घोरपड, मुंगूस, निळं, हरण, रोही यासह इतर जाणारी प्राण्यांचे वास्तव होते. मात्र या माळावरून चक्क राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने दोन जेसीबी व तीन ते चार टिप्पर मशीन लाऊन गेल्या १५ दिवसापूर्वी रात्रीला हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन केले आहे.


एवढेच नव्हे तर त्यांच्या साथीला शहरातील काही गौण खनिज माफियानॆ महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकीय वरद हस्ताचा गैरवापर करून हजारो ब्रास मुरुमांचा उत्खनन करीत रात्रीला गरुजूना विक्री करत आहेत. हा प्रकार अनेकदा उघड झाला. मात्र महसूलच्या अधिकाऱ्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन कुंभकर्णी झोप घेन्याची सवय असल्याने इतिहासकालीन माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या उत्खननामुळे येथे लावलेल्या हजारो वृक्षाचे मुळ्या उघड्या पडल्या असून, वृक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एक्किड़े शासन वृक्ष लावा वृक्ष जगावं, पर्यावरण वाचावा असे नारे देत असताना याचं प्रशासनाचे अधिकारी पर्यावरणाची लख्तरे वेशीवर टांगून रात्रनदिवस गौणखनिज काढून मालामाल होऊ पाहणाऱ्या राजकीय नेत्यांच्या गौण खनिज माफियांना खुली छुट देत आहेत. त्यामुळे ते माफिया जेसीबी आणि ट्रैक्टरच्या सहाय्याने अब्रू लुटल्या प्रमाणे मुरूम काढून पर्यावरणाला हानी पोचविता आहेत. याबाबत अनेक सामाजिक संघटनेच्या लोकांनी तहसीलदार, वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाकडे दूरध्वनीवरून आणि लेखी तक्रारी केल्या. मात्र महसूलच्या अधिकाऱ्यांनी स्वार्थापोटी ठेकेदार व गौण खनिज माफियांना रान मोकळे सोडले आहे.

यामुळे पर्यावरणाला बाधा पोचून अबाबाकरचे आणि पांडवकालीन ऐतिहासिक स्थळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या प्रकाराकडे आता खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांसह, पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी लक्ष देऊन हिमायतनगर शहराजनिक असलेल्या पांडवकालीन माळ पोखरणाऱ्यांवर कार्यवाही करावी. कारण हा सर्व प्रकार महसूलच्या काही लोकांना हाताशी धरून केला जात आहे. या ठिकाणची तात्काळ एटीएस मशीनद्वारे तपासणी करून मागल्या काळात गौण खनिज ऊतकाहनानात वापरण्यात आलेली जेसीबी, टिप्पर, आणि ट्रैक्टर जप्त करून माफियांच्या मुसक्या आवळावयात. आणि ऐतिहासिक वास्तूला बाधा पोचविणाऱ्या ठेकारावर कार्यवाही करून त्यांचे नावे काळे यादीत टाकावे. अन्यथा मराठा साम्राज्य संघ महाराष्ट्र राज्य या गैरप्रकारच्या विरीधात लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करेल..? असा इशारा हिमायतनगर तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे, तालुका उपाध्यक्ष शिवराज सूर्यवंशी, शहराध्यक्ष दीपक मोरे, तालुका सचिव ओंकार गड्डमवार, शहर सचिव ओंकार दळवी आदींसह अनेकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

येत्या चार दिवसात कार्यहावी नाही झाल्यास आमरण उपोषण - मुन्ना शिंदे 

परवाच्या रात्रीला म्हणजे दि. १० च्या रात्रीला अबाबाकरच्या हातून जेसीबीने उत्खनन करून दोन ते तीन ट्रैक्टरद्वारे मुरूम चोरून नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून आमही सर्वजण त्या ठिकाणी पोचलो, सुरुवातील तहसीलदारांना फोन लावला त्यांनी उचलला नाही. म्हणून जिल्हाधिकारी डॉ विपीन याना व्हॅट्सऍपवर लोकेशन देऊन बोलून तक्रार दिली. मात्र त्यावरही प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे हे निवेदन दिले संबंधित गौण खनिज माफियांवर येत्या चार दिवसात कार्यहावी नाही झाल्यास पुढील काळात हिमायतनगर तहसिलसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे माधव शिंदे यांनी सांगितले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी