आजचा उत्स्फूर्त बंद हा केंद्राच्या तानाशाही, महागाई व सामाजिक अन्याय याविरोधात जनतेचा आवाज होय-NNL

 - दिलीप पाटील बेटमोगरेकर (मा जि.प अध्यक्ष नांदेड)


मुखेड, रणजित जामखेडकर।
केंद्र सरकरकडून शेतकरी, जनविरोधी धोरण राबवून तानाशाही,महागाई,बेरोजगारी आणि सामाजिक अन्यायात वाढ या विरोधात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन 

" महाराष्ट्र बंद "ची हाक दिली होती त्यास मुखेड व परिसरातील व्यापारी,नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षणीय असल्याचे मत मा.जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी व्यक्त केले. शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये मुखेड येथे सहभागी होऊन समारोप प्रसंगी त्यांनी सांगितले की, लखीमपुर खीरी सह अनेक ठिकाणी हजारो शेतकरी वर्षभर उन पाऊस थंडीत आपल्या न्याय्य हक्कांसाठी संवैधानिक आंदोलने करीत असताना केंद्र सरकारने न्याय देण्याऐवजी तानाशाही करून आंदोलने चिरडण्याचे प्रयत्न केले.

 नुकतेच शेतकरी लढ्याबद्दल भडकावू भाषण करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालून अनेकजण ठार व जखमी केले. ही तानाशाही व जीवघेणी महागाई,वाढती बेरोजगारी आणि आरक्षण विरोधी धोरण,वाढता सामाजिक अन्याय याविरोधात जनतेचा आवाज म्हणून आज महाराष्ट्र बंद मुखेड मध्ये उत्स्फूर्तपणे यशस्वी झाला.


आजच्या महाराष्ट्र बंद मध्ये मुखेडं येथे शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी,शेकाप सह घटकपक्षाच्या नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आणि व्यापारी,नागरिकांनी सहकार्य करून बंद यशस्वी केला.यावेळी दिलीप पाटील,नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड,शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे,काँग्रेस तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापुरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,जि. प. सदस्य दशरथ लोहबंदे ,शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार,शंकर चिंतमवाड, सुनिल मुक्कावार,उत्तमअण्णा चौधरी,दिलीपराव कोडगिरे, शंकर पाटील लुट्टे,सदाशिव पाटील,संजय बेळीकर, शरद कोडगीरे, संभाजी मुकणर,शादुल होंवडजकर,जयभीम सोनकांबळे,सुरेश पाटील, रामेश्वर इंगोले,सुनिल गावसकर गिळे,गंगाधर चमलवाड,हणमंत नारणाळीकर,संदीप घाटे,शहराध्यक्ष विशालदादा गायकवाड,मारोती घाटे,शिवाजी गायकवाड,इमरान पठाण, बजरंग कल्याने,कॉ. लंगेवाड, शिवाजी गेडेवाड,जयप्रकाश कानगुले आदींसह शेकडो कार्यकर्ते शहरभर फिरून सर्वांचे बंद यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी