हिमायतनगर| सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने हिमायतनगर बंदचे आवाहन करण्यात आले होते, या बांधला व्यापार्यां समिश्रर प्रतिसाद दिला आहे. शहर बंद असले तरी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक दसरा महोत्सवानिमित्त खरेदीसाठी शहरात दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले होते.
उत्तर प्रदेशांतील लखीमपूर खेरी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक ११ रोज सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने हिमायतनगर बंदचे आवाहन काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे यांनी केले होते. दरम्यान सकाळी १० वाजता दुकाने बंद ठेऊन सहकार्य करा असे आवाहन करत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दुचाकीवरून बाजारपेठेतून फिरल्याने व्यापारी बांधवानी बंदला संमिश्र प्रतिसाद दिला आहे.
हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण, माजी ज.प.सदस्य सुभाष राठोड, शहराध्यक्ष संजय माने, शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार, उदय देशपांडे, गणेश शिंदे, कुणाल राठोड, सय्यद मनानं भाई, फेरोज कुरेशी, पंडित ढोणे, आदींसह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.