लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ डावी आघाडीची निदर्शने -NNL


नांदेड|
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडणार्‍या केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेवून त्यांच्या पुत्र व इतर सहकार्‍यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करीत डावी लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

तीन कृषी काळ्या कायद्यांच्या विरोधात देशभर शेतकरी शांततेने आंदोलन करीत असतांना उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर गाडी घालुन चार शेतकर्‍यांचा बळी घेणार्‍या केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा व त्यांचे पुत्र आशिष मिश्रा व त्यांच्या सहकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले परंतु अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. 

या मागणीसाठी डावी लोकशाही आघाडीचे घटक पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माकप, ज. द.च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करुन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर, माकपचे कॉ. विजय गाभणे, ज.द.चे डॉ. पी.डी.जोशी पाटोदेकर, कॉ. उज्ज्वला पडलवार, कॉ. के. के.जांबकर, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.अब्दुल गफार, कॉ. जयराज गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.शिवाजी शेजुळे, कॉ.गणेश संदुपटला, कॉ. श्याम वडजे, कॉ.रफीक पाशा, कॉ. स.ना. राठोड, कॉ. करवंत गायकवाड आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी