अर्धापूर, निळकंठ मदने| उतरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्याच्या अंगावर अमानुष जीप घालून शेतकऱ्यांचे प्राण घेणाऱ्या केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या मुलाला कडक शासन व्हावे,आरोपीच्या वडीलांनी निपक्षपाती चौकशी होण्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीने सोमवारी अर्धापूर शहर १०० टक्के बंद केले.
उतरप्रदेशातील लखीमपूर खौरी येथे शेतकऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलाने जीप चढवून शेतकऱ्यांचे प्राण घेतले,या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री यांनी मंत्रीपदाचा राजीनामा तात्काळ द्यावा,आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, व शेतकरी आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेऊन शेतकऱ्याविरोधी जाचक कायदे रद्द करावेत यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी ११ आँक्टोंबरला सकाळपासून कडक बंद पाळण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्र्वर शेटे,शेख लायक, जिल्हासचिव निळकंठराव मदने,संचालक प्रवीण देशमुख, मदन देशमुख, जि प सदस्य बबनराव बारसे, उपजिल्हा प्रमुख दता पाटील पांगरीकर, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, तालुकाध्यक्ष संतोष कपाटे, शहराध्यक्ष सचीन येवले, काझी सल्लाऊदीन, राँकाँचे तालुकाध्यक्ष उध्दवराव राजेगोरे, युराँकाँचे पप्पू पाटील टेकाळे,अँड सचीन देशमुख, संदीप राऊत, शेख साबेर, डॉ.विशाल लंगडे, नासेरखान पठाण, पप्पू बेग, मुसव्वीर खतीब.
पंडीतराव लंगडे, संभाजी देशमुख,व्यंकटराव साखरे, बाळू पाटील, छत्रपती कानोडे, गाजी काजी, इम्रान सिद्दीकी, म.सुल्तान, मुख्तेदरखान पठाण,दिगंबर तिडके, उध्दवराव सरोदे,सलीम कुरेशी, आर आर देशमुख, उमाकांत सरोदे,शंकरराव ढगे,शेख मकसूद,काजी मुख्तारोदीन, राजू पवार, पंडीत शेटे, अवीनाश लढे, व्यंकटी राऊत, कामाजी अटकोरे, गौसमुल्ला, नामदेव दुधाटे, सचिन शिंदे, गोविंद गोदरे, राजू कल्याणकर, प्रा.रघुनाथ शेटे, यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. पार्डी(म),भोकर फाटा येथेही बंद पाळण्यात आला.