नायगाव, रामप्रसाद चनांवर। नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान पाहणीसाठी आलेले रयत क्रांती संघटनेचे संस्थापक तथा माजी कृषी राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत यांनी नायगाव तालुक्यात वजीरगाव व सोमठाणा या गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
यावेळी आ.सदाभाऊ खोत माध्यमाशी बोलताना म्हणाले की, महाविकास सरकार शेतकरी विरोधी आहे,नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दोन वेळेस अतिवृष्टी व ढगफुटी झाली.पण सरकार कागदपत्रे घोडे नाचवत वेळ काढू धोरण स्वीकारले आहे, हे सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाहीत.
जिल्ह्याचे पालकमंत्री अजून शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाही हे दुर्दैव आहे.शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत घ्यावी व धीर द्यावं अशी मागणी केली. सोमठाणा गावातील साठवण तलाव मावेजा न मिळालेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून ,या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी फोन संपर्क करून हा विषय सांगितला व लवकरच मंत्रालयाच्या दालनात बैठक लावण्याचे आश्वासत केले.आणि हा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तो पर्यंत तुमच्या सोबत रयत क्रांती संघटना उभे राहील.
यावेळी रयत क्रांती संघटना युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे ,जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, तालुकाध्यक्ष शहाजी कदम,युवा तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे,भानुदास पाटील,शिवाजी गायकवाड, संदीप देशमुख,विठ्ठल इंगोले, नितीन आबादार,सरपंच मारोती कदम व शेतकरी, महिला,ग्रामस्थ उपस्थित होते.