नायगाव, रामप्रसाद चनांवर। नायगाव तालुक्यातील सोमठाणा येथील साठवण तलावाची जमीन संपदित केलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लावणार असल्याचे अश्वासन आमदार सदाभाऊ खोत यांनी दिले.
सोमठाणा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की मागील अनेक दिवसापासुन हा प्रश्न प्रलंबित आहे प्रशासनाने येथील शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात जलसंपदा मंत्री यांचा सोबत बैठक लावुन प्रश्न मार्गी लावुन योग्य मोबदला मिळवुन देऊ यानंतरही जर प्रश्न मिटला नाही तर येथील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असे ते म्हणाले.
नायगाव तालुक्यातील सोमठाणा, हिप्परगा व बाबुळगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन भूसंपादन करून तेथे तलावाचे निर्मितीचे काम वर्ष २०१८- १९ सदरील काम पून्हा सुरु झाले आहे. या गावातील जवळपास २०० हेक्टर जमीन सरकारने २०१२ साली संपादन केली. या जमिनीचा मावेजा शेतकऱ्याचा न देता शासनाने कामाला सुरवात केली आहे पण जमिनीवरील आरक्षण हटवा अथवा मावेजा भरपाई द्या यासाठी शेतकऱ्यांनी सन २०२० पर्यंत काम सुरू होऊ दिले नाही पण काही दिवसापुर्वी येथील कामाला सुरवात करण्यात आली आहे त्यामुळे मावेजा मिळाला नसल्यामुळे दि. २७ सप्टेंबर रोजी येथील शेतकरी मालु गायकवाड,लक्ष्मण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयन्त केला, पण प्रशासनाने आडवले त्यामुळे प्रशासन मरुही देईना आणी जगुही देईना अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची आवस्था झाली आहे.
त्यामुळे रयत क्रांती संघटनाचे युवा प्रदेशअध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी हि बाब माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना कळविल्यानंतर वेळीच दखल घेऊन सोमठाणा येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या येत्या दहा दिवसात जलसंपदामंत्री यांच्या सोबत शेतकऱ्यांची तात्काळ बैठक लावुन हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी रयतचे तालुकाध्यक्ष शहाजी पाटील कदम,साहेबराव चट्टे,प्राचार्य मनोहर पवार, भानुदास पाटील कदम,मारोती कदम,नागोराव कदम,गुलाब कदम,परमेश्वर कदम,भास्कर गायकवाड,माधव कदम,श्याम शिरसे,रामजी देवदे,शंकर गायकवाड,व्यकंटराव कदम,पांडुरंग कदम ,आनंदा कदम,उपस्थित होते.