माळाकोळी। दि.2आक्टोबर रोजी देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्ञी, महात्मा गांधी या दोन महामानवाची जयंती चे ओचीत्य साधुन , नायगाव तालूक्यातील लालवंडी येथीला विर जवान श्री नारायण मारोतराव केरुरे देशाची 17 वर्ष देश सेवाकरुन प्रदिर्घ सेवेनंतर सेवा निवृत होउन आज आपल्या मातृभुमी मध्ये आगमन झाले.
जय जवान, जय किसान,वंन्दे मातरम,भारत माति कि जय नारे देउन फटाक्याची आतिश बाजी,बाजा,या सर्व तयारीनेशी ग्रामपंच्यायती च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. विर जवान बोलत असताना ते म्हणाले कि, पूलवामा हल्लाृ झाला असताना मला कोणत्याहि क्षणी जावे लागले. पण कुठ जायच आहे हे माहित नव्हते परंतु मी तेथे वेळेवर पोहचलो.
बाहतर तास उपासी पोटी राहुन विना मोबाइल होतो संदेश देण्यासाठी कुटुबांतील कोणालाहि फोन लावता आला नाहि सगळे माझी वाट पाहत होते तिन दिवसानंतर फोन लावला होता पत्नी व मूले जम्मूला एकटेच दोन महिने होते असा घिसा कथन केला. मीआई वडील, बहिण भाऊ, गावाचीसेवा,समाजसेवा करण्या सदैव कटिबध राहिन फक्त शेतकरीच आपल्या मूलाला देशाची सेवा करण्यास पाठऊ शकतो दूसरा कोणीहि पाठऊ शकत नाहि असेहि त्यांनी सांगीतले, यावेळी श्रीनिवास पाटील चव्हान चेअरमन ख.वि.स.नायगाव,गजानन चौधरी psi,मोहनराव पाटील धुप्पेकर उपसभापती कृ.उ.बा.स.नायगाव, साहेब
पञकार बालासाहेब पांडे,(सरपंच) यूवराज पाटील लालवंडे,पांगरा येथील माजी सरपंच संभाजी पाटील, ,सर्व ग्रा.पं.सदस्य,माजी सैनिक,पञकार बांधव गावातील नागरीक ,नवतरूण उपस्थीत होते सुञसंचलन उमाजी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संदिप केरुरे यांनी केले.