श्रीराम रामेश्वर पिटलेवाड याचा नवोदय परीक्षेत घवघवीत यश -NNL


हिमायतनगर|
तालुक्यातील मौजे एकंबा गावातील सर्वसाधारण कुटुंबातील श्रीराम रामेश्वर पिटलेवाड या विद्यार्थीने नवोदय परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

श्रीराम रामेश्वर पिटलेवाड या विद्यार्थ्यांने हिमायतनगर येथील प्रगती गंगाई कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून, एकूण पाच विद्यार्थी नवोदयाची परीक्षा देण्यासाठी बसले होते. त्यात एकंबा येथील श्रीराम रामेश्वर पिटलेवाड याने यश संपादन केले. त्याने मिळविलेले गुण उत्तम असल्याने त्यांचा ओपन कैटेगिरीतून नवोदयसाठी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

जयक्रांती चालक-मालक सेवाभावी महासंघ यांच्या वतीने जवाहर नवोदय विद्यालय उत्तीर्ण झाल्याबद्दल, श्रीराम रामेश्वर पिटलेवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा संघटक, संतोष धोंडीबा पुट्टेवार, उपाध्यक्ष अमोल चौरे, तसेच शिक्षक कदम सर, संतोष हरडपकर, संदीप सर,  मिर्झा सर, कोथळकर सर, साई सर, नरवाडे सर, सूर्यवंशी सर, अंकुश सर यांनी कौतुक केले. आणि एकंबा येथील सरपंच प्रभू कोंकेवाड, उपसरपंच परभु कल्याणकर, परसराम आरकेलवाड यांनी सुद्धा श्रीराम रामेश्वर पिटलेवाड यास पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले जात आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी