नविन नांदेड। राजस्थान येथील जोधपुर येथे अपघातात विर मरण आलेले बि.एस.एफ.चे जवान संतोष सिदापुरे यांच्या पार्थिव देहावर लातुर फाटा सिडको येथे जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, जिल्हा परिषद सि.ओ.वर्षा ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाचा वतीने पुष्प चक्र अर्पण केले.
बि.एस.एफ जवान संतोष सिदापुरे हे राजस्थान येथे सराव करीत असतांना २ आक्टोबर रोजी अपघाती मरण आले ते नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथील रहिवासी असल्याने त्यांचा पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचा मृतदेह हैदराबाद येथे दि.४ आक्टोबर रोजी विमानाने आणल्या नंतर वाहनाने हैदराबाद ते देगलुर मार्ग नरसी , नायगाव,घुंगराळा,चंदासिग चोक,रमामाता चौक ते लातुर फाटा येथे आणण्यात आल्या नंतर चारचाकी फुलांनी सजावट केलेल्या वाहनात ठेवण्यात आला.
यावेळी शहीद जवान अमर रहे,भारत माता की जय,जय हिंद या घोषणेने परिसर दणाणून गेला,उघड्या ठेवण्यात आलेल्या वाहनावर बि.एस.एफ.चे अधिकारी, जवान यांच्या सह अधिकारी ऊपसिथीत होते. लातूर फाटा येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, जिल्हा परिषद सि.ओ. वर्षा ठाकूर यांनी पुष्पचक्र अर्पण केले,या वेळी दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण चे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी, यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता,लातुर फाटा येथे वाहतूक एक तर्फी सुरूळीत करण्यात आली होती. सकाळ पासूनच लातुर फाटा येथे मोठ्या संख्येने नागरिक पार्थिवदेह येणार म्हणून जमा होत होते. दुपारी सोनखेड येथे हजारो जण समुदाय यांच्या ऊपसिथीत शासकीय ईतमांमात अंत्यसंस्कार करण्यात आले.