देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पांडुरंग शिंदे यांची मागणी
नांदेड। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी आले असता,
रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी देवेंद्रजी फडणवीस भेट घेऊन आपण मुख्यमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये सन २०१९ मध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी सरकारने जी मदत त्या भागात दिली होती, त्याच धर्तीवर मदत मराठवाडा विशेषता नांदेड जिल्ह्यात मिळून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
पांडुरंग शिंदे आपल्या निवेदनात म्हटले की जिल्ह्यात सप्टेंबर एका महिन्यात दोन वेळेस अतिवृष्टी व ढगफुटीमुळे नुकसानीचे तांडव माजले असून ५ लाख ७७ हजार ५७२ हेक्टर वरील शेती पिकाची पूर्णता नासाडी झाली आहे. ०१ हजार ४४९ घराची पडझड झाली आहे,पुरात वाहून ३६ त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अशी प्राथमिक माहिती द्वारे निदर्शनात येते पण त्यापेक्षा किती तरी जास्त नुकसान जिल्ह्यामध्ये झालेले आहे.
जिल्ह्यातल्या शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आणि आर्थिक व मानसिक दृष्ट्या येथील नागरिक खचलेले आहेत, त्यामुळे सरकारने तात्काळ मदत करून धीर द्यावा. एनडीआरएफ नियमानुसार पिक विमा १०० टक्के लागू करावा, पुरामुळे शेतजमीन खरडून गेलेल्या नदी-नाल्या काठच्या गावांना विशेष मदत द्यावी. बागायत शेतीसाठी हेक्टरी ०१ लाख, जिराईत शेतीसाठी हेक्टरी ५०हजार, मनुष्य मृत्यू झालेल्या कुटुंबाला १० लाख व जनावरांसाठी प्रति जनावर ०१ लाख रुपयाची* मदत द्यावी अशा प्रमुख मागण्या शिंदे यांनी केल्या आहेत.