हिमायतनगर। तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे शेजारच्या घरातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाचा काठीने मारहाण झालेल्या घटनेत जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून एक जन गंभीर जखमी झाला आहे.हि घटना मंगळवार दि. 26 च्या रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणााऱ्या मौजे मंगरूळ येथील शेजारी शेजारी राहत असलेल्या नागरिकात किरकोळ वादातून वर्ध्याच्या खूणाची घटना घडली आहे. यातील आरोपी हा आपल्या घरी आईसोबत भांडण करत असतांना शेजारी राहणारे या घटनेतील मयत विठ्ठल मसाजी गोरेकर वय 60 वर्ष हे घरी भांडण का? करत आहेस म्हणून भांडण सोडविण्यासाठी गेले होते. आरोपी हा तु आम्हास शहाणपण सांगतोस का? म्हणून वाद घालत होता. दरम्यान दोघात शाब्दिक चकमक झाली.
आरोपी किरण माधव गोपले रा. मंगरूळ यांने रागाच्या भरात विठ्ठल गोरेकर यांना काठीने जबर मारहाण केली. माझ्या वडिलांना का ? मारतोस म्हणून गेलेल्या विलास विठ्ठल गोरेकर यासही काठीने मारूण गंभीर जखमी केले आहे. या घटनेत विठ्ठल गोरेकर हे जागीच ठार झाले आहेत. जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी किरण गोपले हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मयताची मुलगी सविता संतोष गायकवाड वय 22 वर्ष रा. पांगरी ता. किनवट यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आरोपी किरण माधव गोपने, शांताबाई माधव गोपने यांचेवर गुरन.254, कलम 302, 307, 324, 109, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन हे करीत आहेत. या घटनेमुळे मंगरूळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी मयतावर शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.